Install App Install App

अॅमेझॉन नवीन किंडल भारतात लाँच, किंमत ५,९९९ रुपये

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 23 Jun 2016
HIGHLIGHTS
  • हा नवीन किंडल आपल्या जुन्या व्हर्जनपेक्षा खूपच पातळ आणि हलका आहे आणि ह्याची किंमत ५,९९९ रुपये आहे.

अॅमेझॉन नवीन किंडल भारतात लाँच, किंमत ५,९९९ रुपये

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा अॅमेझॉन किंडल न्यू व्हर्जन ५,९९९ रुपये

ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनने भारतात आपला नवीन किंडल व्हर्जन लाँच केला आहे. ह्या नवीन किंडलचे डिझाईन खूपच चांगले आणि वेगळे आहे. हा पांढ-या आणि काळ्या अशा दोन रंगात उपलब्ध आहे. कंपनीने ह्याची किंमत ५,९९९ रुपये ठेवली आहेय हा नवीन किंडल फ्री क्लाउड स्टोरेजसह येतो.

कंपनीचा दावा आहे की, हा नवीन किंडल यूजरला खूप चांगला आणि वेगळा अनुभव देईल. ह्या किंडलवर जेव्हा यूजर काही वाचेल तेव्हा त्याला वाटेल की, तो एखाद्या कागदावर हे सर्व वाचत आहे. हा खूपच हलका आणि पातळ असल्यामुळे हा एका हातात पकडून वापरणेही खूप सोपे झाले आहे. ह्या नवीन किंडलच्या बॅटरीचे प्रदर्शनही खूप चांगले आहे. ह्याला वायफायशी कनेक्ट केले जाऊ शकते.

हेदेखील वाचा - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ह्यात 6 इंचाची डिस्प्ले दिली आहे. हा ई इंक पर्ल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 167ppi आहे. ह्यात 4GB चे स्टोरेज दिले आहे. ह्याच्या बॅटरीला ४ तासांत पुर्ण चार्ज केले जाऊ शकते. हा किंडल फॉर्मेट 8 (AZW3), किंडल (AZW), TXT, PDF, HTML, DOC, DOCX, JPEG, GIF, PNG आणि BMP ला सपोर्ट करतो. ह्याचा आकार 160x115x9.1mm आणि वजन १६१ ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा - मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये
हेदेखील वाचा - 
स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
Amazon kindle India
DMCA.com Protection Status