आज सकाळपासूनच जिकडे तिकडे ‘ऑपरेशन सिंदूर’ची चर्चा सुरु आहे. अलीकडेच 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम-बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला. याच हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढला आहे. आपल्या सीमेवर सशस्त्र दल सज्ज असले तरी, भारतीय नागरिकांनीही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असणे, आता महत्त्वाचे झाले आहे. संवाद, सुरक्षितता आणि जगण्यासाठी अशा कठीण काळात प्रत्येक भारतीय घरात असले पाहिजेत, अशा ‘5’ आवश्यक Gadgets बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Also Read: Price Cut! 50MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Oppo फोन झाला स्वस्त! जाणून घ्या नवी किंमत
युद्धकाळात किंवा ब्लॅकआउटमध्ये मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट बंद पडल्यास, बॅटरीवर चालणारा रेडिओ तुमची जीवनरेखा बनतो. यासह सुनिश्चित होते की, तुम्हाला ऑल इंडिया रेडिओ किंवा इतर आपत्कालीन प्रसारणांद्वारे सरकारी आणि लष्करी स्रोतांकडून थेट अपडेट्स मिळतील. महत्त्वाचे लक्षात घ्या की, अतिरिक्त उपयुक्ततेसाठी सौर चार्जिंग, फ्लॅशलाइट आणि USB सपोर्ट असलेल्या मॉडेलची निवड करा.
हल्ले किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये वीजपुरवठा खंडित होणे, हे अशा परिस्थितीत सामान्य आहे. उच्च क्षमतेची सोलर पॉवर बँक तुम्हाला फोन, रेडिओ किंवा टॉर्च सारखी आवश्यक उपकरणे चार्ज करण्यास उपयुक्त ठरतील.
बॉम्बस्फोट, ब्लॅकआउट किंवा कर्फ्यू दरम्यान दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होणे देखील सामान्य आहे. रिचार्जेबल एलईडी लाईट्स किंवा सौरऊर्जेवर चालणारे कंदील तुमच्या घरात दृश्यमानता आणण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याबरोबरच, हेडलॅम्प हँड्स-फ्री ऑपरेशनसाठी उपयुक्त आहेत, विशेषतः अंधारात नेव्हिगेट करताना किंवा इतरांना मदत करताना हेडलॅम्प्सचा योग्य उपयोग होतो.
आपत्कालीन परिस्थितीत स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे कठीण होऊ शकते. लाईफस्ट्रॉ सारखे पोर्टेबल वॉटर फिल्टर किंवा कोणताही यूव्ही-आधारित प्युरिफायर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवतो.
एक संपूर्ण महत्त्वाच्या वस्तू असलेली प्रथमोपचार किट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये अँटीसेप्टिक्स, बँडेज, प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स आणि डिजिटल थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटर सारखी उपकरणे हवीत. युद्धाच्या काळात, रुग्णालयांमध्ये प्रवेश मर्यादित असू शकतो. ज्यामुळे घरी मूलभूत आरोग्य समस्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यासाठी वैद्यकीय किट तुमच्या घरात असणे आवश्यक आहे.