Tech Tips: फक्त एका क्लिकसह स्किप करा मोठी ‘सायबर फ्रॉडपासून सावधान’ Caller Tune, जाणून घ्या कसे?

Updated on 06-Feb-2025
HIGHLIGHTS

स्कॅमर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच एक विशेष उपक्रम सुरू केला आहे.

कॉल कनेक्ट करण्यापूर्वी 'सायबर फ्रॉडपासून सावध रहा' अशी जागरूकता देणारी मोठी कॉलर-ट्यून ऐकू येते.

सायबर क्राईम अवेअरनेस कॉलर ट्यून आता सहज स्किप करता येईल.

Tech Tips: आपणा सर्वांना माहितीच आहे की, डिजिटल युगात गेल्या काही काळापासून सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. स्कॅमर निष्पाप लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन फसवण्यासाठी नवीन पद्धती वापरतात. अशा स्कॅम्स आणि फसवणुकीपासून सायबर गुन्ह्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच एक विशेष उपक्रम सुरू केला आहे.

Also Read: Tips: Google Pay वर ‘अशा’प्रकारे बंद करा ऑटो पे! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया

आम्ही तुम्हाला सांगतो की, या उपक्रमांतर्गत तुम्ही एखाद्याला कॉल करताच, कॉल कनेक्ट होण्यापूर्वी, तुम्हाला ‘सायबर फ्रॉडपासून सावध रहा’ अशी जागरूकता देणारी मोठी कॉलर-ट्यून ऐकू येते. सरकारने हे सामान्य जनतेच्या हितासाठी सुरु केले असेल तरीही, जेव्हा जेव्हा आपण कॉल करतो आणि तोच कॉलर-ट्यून मेसेज पुन्हा पुन्हा ऐकतो तेव्हा नक्कीच वैताग येतो.

याव्यतिरिक्त, तुम्हाला एखाद्याला तात्काळ संपर्क करायचा असेल तर, ही लांब आणि मोठी कॉलर ट्यून तुमचा वेळ घेते. आपल्याला तो वगळून लगेच कॉल कनेक्ट करावासा वाटतो. मात्र, आता याची चिंता करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही ही कॉलर-ट्यून मेसेज सहज स्किप करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, सायबर क्राईम अवेअरनेस कॉलर ट्यून स्किप करता येईल. पहा प्रक्रिया-

सायबर क्राईम अवेअरनेस कॉलर ट्यून ‘अशा’प्रकारे स्किप करा:

  • सायबर क्राईम अवेअरनेस कॉलर ट्यून स्किप करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डायलरवर ऍपवर जावे लागेल.
  • आता तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्याचा नंबर डायल करा.
  • कॉल सुरू होण्यापूर्वी, तुम्हाला ‘सायबर फ्रॉडपासून सावधान’ ही कॉलर ट्यून ऐकू येईल.
  • ही कॉलर-ट्यून वगळण्यासाठी तुम्हाला कीपॅड उघडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला फक्त कीपॅडमधील क्रमांक 1 वर टॅप करावे लागेल. कॉल दरम्यान तुम्ही नंबर १ दाबताच, कॉलपूर्वी वाजणारी जागरूकता कॉलर ट्यून स्किप केली जाईल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याला ताबडतोब कॉल कराल, तेव्हा ही युक्ती तुमच्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरेल. यासह, तुम्हाला जबरदस्तीने म्हणजेच सक्तीने संपूर्ण कॉलर ट्यून ऐकण्याची गरज नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :