Tata Play ने केली Prime Video शी हातमिळवणी, आता अतिशय कमी किमतीत मिळेल मनोरंजनाचा संपूर्ण डोस 

Tata Play ने केली Prime Video शी हातमिळवणी, आता अतिशय कमी किमतीत मिळेल मनोरंजनाचा संपूर्ण डोस 
HIGHLIGHTS

DTH आणि Tata Play बिंज ग्राहकांना Prime Video कंटेंटचा ऍक्सेस मिळेल.

युजर्सना Prime Video सह 6 OTT ॲप्ससाठी दरमहा 199 रुपये द्यावे लागतील.

या प्लॅनसह वापरकर्ते Amazon वर फ्री शिपिंग आणि विशेष डीलचा लाभ देखील घेऊ शकतात.

प्रसिद्ध कंटेंट डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म Tata Play ने आपल्या DTH आणि Tata Play बिंज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. होय, DTH आणि Tata Play बिंज ग्राहकांना Prime Video कंटेंटमध्ये ऍक्सेस देण्यासाठी Tata Play ने Amazon Prime सोबत पार्टनरशिप केली आहे. या सहयोगाने ग्राहकांना दरमहा 199 रुपयांपासून विविध किंमतीत प्लॅन्स मिळतील, जे ग्राहकांना Prime Lite सह अनेक टीव्ही चॅनेल ऑफर करतील, असे Tata Play ने सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा: Disney+Hotstar वर उपलब्ध ‘हे’ लोकप्रिय कोरियन ड्रामा बघा अगदी Free, बघा संपूर्ण यादी

DHT आणि OTT चे आकर्षक प्लॅन्स

Tata Play Binge वापरकर्ते Prime Lite आणि 30 हून अधिक लोकप्रिय ॲप्सचा आनंद नवीन प्लॅन्स अंतर्गत विविध किंमतींसह घेऊ शकतात. वापरकर्ते Prime Video सह 6 OTT ॲप्ससाठी दरमहा 199 रुपयांपासून सुरू होणाऱ्या पॅकेजसाठी 33 ॲप्सच्या सूचीमधून निवड करू शकतात. किंवा, Prime Video सह सर्व 33 ॲप्सची सदस्यता दरमहा 349 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Tata Play Partners with Amazon Prime Video
Tata Play Partners with Amazon Prime Video

Amazon Prime आणि Tata Play Plans

Amazon Prime आणि Tata Play DTH आणि OTT वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्लॅन्स आणि बेनिफिट्स ऑफर करतात.

199 रुपयांचा प्लॅन

DHT पॅक असलेले सदस्य प्राइम व्हिडिओ कंटेंटचा आनंद घेण्यासाठी Tata Play P सह Prime Lite मध्ये ऍक्सेस करू शकतात. या प्लॅनसह तुम्ही कंटेंटचा ऍक्सेस 2 स्क्रीनवर घेऊ शकता. उदा. मोबाईल किंवा TV किंवा लॅपटॉप इ. विशेष म्हणजे, या प्लॅनसह वापरकर्ते Amazon वर फ्री शिपिंग आणि विशेष डीलचा लाभ देखील घेऊ शकतात.

Prime Lite बेनिफिट्स

Tata Play बिंज सदस्यांसाठी Prime Lite देखील दोन स्क्रीनवर प्राइम Video कंटेंटमध्ये ऍक्सेस आणि विशेष डीलसह समान फायदे ऑफर करते. याशिवाय, ग्राहकांना Amazon वर सेम डे डिलिव्हरी आणि नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळू शकते. वापरकर्ते प्राइम लाइटसह 6 OTT ॲप्समधून 199 रुपये प्रति महिना दराने निवडू शकतात. किंवा, वर सांगितल्याप्रमाणे, Prime Lite सह सर्व 33 ॲप्सचा आनंद 349 रुपये प्रति महिना खरेदी करू शकतात.

Amazon Prime
Amazon Prime

Amazon Prime चे वार्षिक सबस्क्रिप्शन

वरील नवीन प्लॅन्सच्या व्यतिरिक्त, DHT ग्राहक मर्यादित काळासाठी परिचयात्मक ऑफर म्हणून Tata Play DHT द्वारे Amazon Prime चे वार्षिक सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात, असे Tata Play चे म्हणणे आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये वापरकर्त्यांना 5 डिवाइसवर Prime Video, फ्री शिपिंग, Amazon Music, Prime Reading आणि Prime Gaming चा ऍक्सेस मिळतो. Amazon Prime चे वार्षिक सबस्क्रिप्शन 14,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo