Disney+Hotstar वर उपलब्ध ‘हे’ लोकप्रिय कोरियन ड्रामा बघा अगदी Free, बघा संपूर्ण यादी 

Disney+Hotstar वर उपलब्ध ‘हे’ लोकप्रिय कोरियन ड्रामा बघा अगदी Free, बघा संपूर्ण यादी 
HIGHLIGHTS

तरुणाईमध्ये K-ड्रामा म्हणजे कोरियन वेब सिरीजची क्रेझ वाढत चालली आहे.

K-ड्रामाबद्दलच्या वाढत्या प्रेमामुळे OTT प्लॅटफॉर्मने अनेक K-ड्रामा भारतीय भाषांमध्ये सादर केले आहेत.

Snowdrop या सीरिजला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे.

सध्या जिकडे तिकडे देशी तसेच विदेशी वेब सीरिजचे ट्रेंड सुरु आहे. दर आठवड्याला भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये OTT प्लॅटफॉर्म्सवर अनेक वेब सिरीज रिलीज होत असतात. विशेष वेब सिरीजचे भारतीय तरुणाईमध्ये जणु वेडंच लागले आहे. खरं तर, यापैकी सध्या तरुणाईमध्ये K-ड्रामा म्हणजे कोरियन वेब सिरीजची क्रेझ वाढत चालली आहे.

भारतातील K-ड्रामाबद्दलच्या वाढत्या प्रेमामुळे, OTT प्लॅटफॉर्म जसे की Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Jio Cinema आणि इतर अनेकांनी देखील काही उत्कृष्ट हिंदी-डब केलेले K-ड्रामा सादर केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लोकप्रिय प्लॅटफॉर्म Disney+Hotstar वर भारतीय भाषांमध्ये डब केलेल्या K-ड्रामाबद्दल माहिती देणार आहोत. पुढील सर्व सिरीज प्लॅटफॉर्मवर अगदी मोफतमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी-

हे सुद्धा वाचा: Netflix वर उपलब्ध ‘हे’ 5 अतिशय Horror चित्रपट उडवतील तुमच्या रात्रीची झोप, बघा यादी

More Than Friends

More Than Friends हा एक रोमँटिक कोरियन ड्रामा आहे. ही कथा असा मित्र-मैत्रिणीच्या भोवती फिरते, जे स्कुल टाइमपासून गैरसमजामुळे 10 वर्षांहून अधिक काळ एकमेकांवर क्रश करत राहिले. या सिरीजमध्ये मित्रमंडळींची मजा-मस्ती तसेच लव्ह ट्रँगल सारखे सीन देखील दाखवण्यात आले आहेत. ही एकूण 16 भागांची सिरीज आहे. सिरीजमध्ये Ong Seong-wu, Shin Ye-eun, Ahn Eun-jin हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजला IMDb वर 6.6 रेटिंग मिळाले आहे.

Snowdrop

स्नोड्रॉपमध्ये एका युनिव्हर्सिटी विद्यार्थ्याची कथा आहे, जो राजकीयदृष्ट्या अशांत काळात महिलांच्या वसतिगृहात आश्रय घेतो. त्याच विद्यापीठातील एका विद्यार्थ्यासोबत रोमँटिक संबंध विकसित करताना तो उत्तर कोरियन म्हणून आपली खरी ओळख लपवतो. या सीरिजला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. सिरीजमध्ये Jung Hae-in, Kim Jisoo, Kim Hye-yoon हे कलाकार आहेत.

Rain or Shine

‘रेन ऑर शाइन’ एका लहान-शहरातील रेडिओ स्टेशनवरील कर्मचाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. कारण ते स्टेशनचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करतात आणि डिजिटल मीडियाद्वारे उभ्या असलेल्या आधुनिक आव्हानांमध्ये त्याची लोकप्रियता पुन्हा मिळविण्यात मदत करतात. सिरीजमध्ये Lee Jun-ho, One Jin-Ah, Lee Ki-woo हे कलाकार मुख्य भुमीकेत आहेत.

Sketch

तुम्ही रोम-कॉम शैलीतील क्लिच K-ड्रामा पाहून कंटाळला असाल, तर थ्रिलर स्केच पाहणे ही चांगली कल्पना राहील. हॉटस्टारवरील हिंदी-डब केलेला के-ड्रामा कांग डोंग-सू या प्रतिभावान पोलिस स्केच कलाकाराभोवती फिरते. हे एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्याकडे वर्णनांच्या आधारे गुन्हेगारी दृश्ये आणि संशयितांची कल्पना करण्याची विलक्षण क्षमता आहे. या सीरिजला IMDb वर 7.5 रेटिंग मिळाले आहे. सिरीजमध्ये Lee chae bin, Jung Jin young, Kang Shin-il हे कलाकार मुख्य भुमीकेत आहेत.

The Golden Spoon

तुम्ही एक दिवस किंवा महिनाभर कोणीतरी होण्याची संधी मिळवाल का? गोल्डन स्पून सिरीजमध्ये देखील हेच दाखवण्यात आले आहे. ही कथा दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पाऊल ठेवण्याच्या संधीभोवती फिरते. ली सेउंग-चेऑन हे वंचित कुटुंबात जन्मलेले मूल आहे. तथापि, जेव्हा तो एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मित्रासोबत नशिबाची देवाणघेवाण करतो तेव्हा त्याचे नशीब नाट्यमय वळण घेते. या सीरिजला IMDb वर 7.6 रेटिंग मिळाले आहे. सिरीजमध्ये Yuk Sung Jae, Yeon Woo, Lee Jong-Won हे कलाकार मुख्य भुमीकेत आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

 
Digit.in
Logo
Digit.in
Logo