Starlink India Launch: SpaceX आणि Airtel ची हातमिळवणी! भारतात सॅटेलाईट इंटरनेट आणण्याची जबरदस्त तयारी 

HIGHLIGHTS

Airtel ने एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील असलेल्या SpaceX सोबत कोलॅबरेशनची घोषणा केली.

या करारासह Airtel च्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा देखील Starlink ला होणार आहे.

स्टारलिंकसोबतच्या या नवीन करारामुळे Airtel चे कव्हरेज आणखी वाढेल.

Starlink India Launch: SpaceX आणि Airtel ची हातमिळवणी! भारतात सॅटेलाईट इंटरनेट आणण्याची जबरदस्त तयारी 

Starlink India Launch: भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील असलेल्या SpaceX सोबत कोलॅबरेशनची घोषणा केली आहे. यासह ग्राहकांना स्टारलिंकची हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा सादर करता येईल. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे सहकार्य SpaceX ला भारतात स्टारलिंक विकण्यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी मिळण्यावर अवलंबून असणार आहे. अधिक कालावधीपासून एलॉन मस्कचे स्टारलिंक भारतात येण्याच्या तयारीत आहेत.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

महत्त्वाचे म्हणजे अद्याप स्टारलिंकला भारतीय ऑथॉरिटीजचे लायसेन्स मिळाले नाही. टेलिकॉम दिग्गज Airtel ने एक प्रेस रिलीज जारी करून या कराराबद्दल माहिती दिली आहे. जर भारतात स्टारलिंक आले तर, Airtel द्वारे याचे इक्विपमेंट्स विक्रीसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. त्याबरोबरच, या करारासह Airtel च्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा देखील Starlink ला होणार आहे. या कराराचा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे.

Also Read: JioHotstar Free! दीर्घकालीन वैधतेसह स्वस्त Jio प्लॅन लाँच, किंमत आहे फक्त 100 रुपये

आम्ही तुम्हाला सांगतो की, Elon Musk चे Starlink जगभरात मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आहे. यामध्ये इंटरनेट थेट सॅटेलाईटवरून मिळते. यासाठी तुम्हाला तुमच्या छतावर कंपनीचा अँटिना लावावा लागेल, जो स्टारलिंक सॅटेलाईटसह कनेक्ट होईल. स्टारलिंकचे सॅटेलाईट इतर सॅटेलाईट्सपेक्षा खाली असतात, जेणेकरून यासह इंटरनेट कनेक्टिव्हिटी फास्ट असते.

स्टारलिंकसोबतच्या या नवीन करारामुळे Airtel चे कव्हरेज आणखी वाढेल, विशेषतः ज्या भागात इंटरनेटची सुविधा नाही अशा भागात इंटरनेटची फास्ट सुविधा मिळेल. यामुळे दुर्गम भागातील व्यवसाय आणि समुदायांना हाय-स्पीड ब्रॉडबँड उपलब्ध होईल, ज्यामुळे विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

SpaceX ने काय म्हटले?

स्पेसएक्सचे अध्यक्ष ग्विन शॉटवेल म्हणाले, “स्टारलिंकचा परिवर्तनकारी प्रभाव भारतातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एअरटेलसोबत काम करण्यास आम्हाला उत्सुकता आहे. एअरटेल टीमने भारताच्या दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे हे आमच्यासाठी योग्य पाऊल आहे.”

Airtel ने काय म्हटले?

भारती Airtel चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले की, भारतातील एअरटेल ग्राहकांना स्टारलिंक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेसएक्ससोबत काम करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे नेक्स्ट जनरेशनच्या सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते. ते पुढे म्हणाले की, “या भागीदारीमुळे आम्हाला भारतातील सर्वात दुर्गम भागातही हाय-स्पीड ब्रॉडबँड पोहोचवण्याची क्षमता मिळेल. स्टारलिंक एअरटेलच्या उत्पादनांमध्ये आणखी वाढ करेल, जेणेकरून प्रत्येक भारतीय युजरला परवडणारे आणि विश्वासार्ह इंटरनेट मिळेल.”

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo