JioHotstar Free! दीर्घकालीन वैधतेसह स्वस्त Jio प्लॅन लाँच, किंमत आहे फक्त 100 रुपये 

HIGHLIGHTS

Jio ने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे.

Jio च्या या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 100 रुपये आहे.

या प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्ससह युजरच्या मनोरंजनाची पूर्ण सोय करण्यात आली आहे.

JioHotstar Free! दीर्घकालीन वैधतेसह स्वस्त Jio प्लॅन लाँच, किंमत आहे फक्त 100 रुपये 

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. हा Jio चा नवीन डेटा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना केवळ अतिरिक्त डेटाच मिळणार नाही तर, विशेष JioHotstar Free OTT सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फायदा वापरकर्त्यांना काही दिवसांसाठीच नाही तर संपूर्ण 90 दिवसांसाठी उपलब्ध असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या Jio प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Jio चा 100 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 100 रुपये आहे. या प्लॅनची विशेष गोष्ट म्हणजे हा प्लॅन केवळ 100 रुपयांमध्ये संपूर्ण तीन महिन्यांची वैधता देतो. होय, हा रिचार्ज प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. तुम्हाला या योजनेअंतर्गत पूर्ण 90 दिवसांसाठी बेनिफिट्स मिळतील.

नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 5GB डेटा मिळतो. तुम्ही हा 5GB डेटा पूर्ण 90 दिवसांसाठी वापरण्यास सक्षम असाल. याशिवाय, या प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्ससह युजरच्या मनोरंजनाची पूर्ण सोय करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, JioCinema आणि Disney+ Hotstar च्या विलीनीकरणानंतर JioHotstar प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे.

Free JioHotstar Plan Under 100

लक्षात घ्या की, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला JioCinema आणि Disney Plus Hotstar या दोन्हींच्या कंटेंटचा ऍक्सेस मिळतो. या OTT बेनिफिट्ससह, तुम्ही स्मार्टफोन तसेच स्मार्ट टीव्हीवर JioHotstar ऍक्सेस करण्यास सक्षम असाल. महत्त्वाचे म्हणजे इतर प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्ये व्हॉइस आणि SMS चे फायदे मिळणार नाहीत. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना फक्त डेटा लाभ मिळतो. हा प्लॅन Jio च्या साइटवर 90 दिवसांच्या वैधतेसह सूचीबद्ध करण्यात आला आहे.

Jio चा 195 रुपयांचा डेटा प्लॅन

आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio ने अलीकडेच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी 195 रुपयांचा डेटा प्लॅन लाँच केला होता. या प्लॅनमध्येही वापरकर्त्यांना डेटासह OTT फायदे मिळतात. मात्र, नवीन प्लॅन 195 रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे. या प्लॅनमध्ये JioHotstar OTT बेनिफिट्स आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये 15GB डेटा मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo