Price Cut! लोकप्रिय Samsung Galaxy Tab S10 सीरीजच्या किमतीत मोठी कपात, हजारो रुपयांची घसरण 

HIGHLIGHTS

Samsung ची आगामी फ्लॅगशिप सिरीज Samsung Galaxy S25 लवकरच टेक विश्वात दाखल होणार

Samsung कंपनीने या आठवड्यात Galaxy Tab लाइनअपची किंमत कमी केली आहे.

Samsung Galaxy Tab S10 सिरीज Galaxy AI फीचर्स उपलब्ध आहेत.

Price Cut! लोकप्रिय Samsung Galaxy Tab S10 सीरीजच्या किमतीत मोठी कपात, हजारो रुपयांची घसरण 

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ची आगामी फ्लॅगशिप सिरीज Samsung Galaxy S25 लवकरच टेक विश्वात दाखल होणार आहे. मात्र, त्याआधी कंपनीने आपली आपल्या प्रीमियम प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. कंपनीने या आठवड्यात Galaxy Tab लाइनअपची किंमत कमी केली आहे. कंपनीने Samsung Galaxy Tab S10 सीरीज आपल्या फ्लॅगशिप टॅबलेटची किंमत तब्बल 19 हजार रुपयांनी कमी केली आहे, अशी माहिती अहवालानुसार मिळाली आहे. पहा नवी किंमत-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: 50MP फ्रंट कॅमेरासह Vivo V40 Pro 5G वर तब्बल 6000 रुपयांची सूट, अशी डील पुन्हा मिळणार नाही

Samsung Galaxy Tab S10 सीरीजची नवी किंमत

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, लोकप्रिय Samsung Galaxy Tab S10 Wi-Fi मॉडेल कंपनीने 90,999 रुपये किमतीत लाँच केले होते. कंपनीने इतर व्हेरियंटच्या किमती देखील कमी केल्या आहेत. कपात केल्यानंतर या टॅबलेटची किंमत 71,999 रुपये इतकी आहे. तर, Galaxy Tab S10 Ultra टॅबच्या Wi-Fi च्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 108,999 रुपयांवरून थेट 88,999 रुपये करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर, यावर ऑफर्स देखील उपलब्ध आहे. तसेच, ग्राहकांना 19 हजार रुपयांचा बँक कॅशबॅक किंवा 12 हजार रुपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. या सर्व ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही Galaxy Tab S10 सिरीज मोठ्या बचतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल. नवीन किमतीसह टॅबलेट्स लवकरच कंपनीच्या अधिकृत साईट किंवा इ-कॉमर्स साईटवर सूचिबद्ध होऊ शकतात. अधिक माहितीसाठी Samsung च्या अधिकृत साईट किंवा इ-कॉमर्स साईट्सना भेट द्या.

Samsung Galaxy Tab S10 series

Samsung Galaxy Tab S10 सीरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy Tab S10 सिरीज Galaxy AI फीचर्स उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर, या टॅब्लेट्समध्ये न असिस्टंट आणि ड्रॉईंग असिस्टंटसारखे फीचर्स देखील मिळतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले Galaxy Tab S10 Ultra आणि Tab S10 मध्ये उपलब्ध आहे. तर, दोन्ही टॅब्लेटमध्ये अनुक्रमे 14.6-इंच लांबीचा डिस्प्ले आणि 12.4-इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोन्ही टॅबलेट S-पेन स्टायलस सपोर्टसह येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo