अलीकडेच Pi Network च्या Pi coin चे पदार्पण झाले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ही क्रिप्टोकरन्सी 20 फेब्रुवारी रोजी लाँच झाली. यानंतर त्याची किंमत प्रचंड घसरली. 24 तासांत ते निम्म्याहून अधिक घसरले होते, परंतु आता ते प्रचंड वेग घेताना दिसत आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसांतच Pi नेटवर्क क्रिप्टोकरन्सीची किंमत आता प्रचंड वाढू लागली आहे. होय, पुढे आलेल्या वृत्तानुसार, अवघ्या चार दिवसांत त्याने बिटकॉइन, इथेरियम, डोगेकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सींना मागे टाकले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, चार दिवसांत त्याने सुमारे तब्बल 150% परतावा म्हणजेच रिटर्न दिले आहे.
Also Read: Pi Coin म्हणजे काय? जिकडे तिकडे सुरु आहे Pi नेटवर्कची चर्चा! मोबाईल ऍप द्वारे होईल चांगली कमाई
लक्षात घ्या की, Pi नेटवर्क कॉइन 20 फेब्रुवारी रोजी $1.84 ला लाँच करण्यात आले. मात्र, लाँच झाल्यानंतर त्यात घट होऊ लागली. दुसऱ्या दिवशी, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता त्याची किंमत $0.64 पर्यंत घसरली. हे त्याचे आतापर्यंतचे सर्वात कमी मूल्य आहे. यानंतर, त्याचे मूल्य वेगाने वाढू लागले आहे. दरम्यान, पाय नेटवर्क कॉईनने चार दिवसांत गुंतवणूकदारांना प्रचंड बेनिफिट दिले आहे. मंगळवारी रात्री 10 वाजता त्याची किंमत $1.59 होती. अशा परिस्थितीत, या चार दिवसांत सुमारे 148% वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इतर क्रिप्टोकरन्सीची परिस्थिती थोडी वाईट म्हणजेच घसरत असल्याचे दिसत आहे. गेल्या 5 दिवसांत बिटकॉइन 4.47% ने घसरला आहे. तर, इथरियम 11% हून अधिक घसरला आहे. याव्यतिरिक्त, दिग्गज एलोन मस्कची आवडती क्रिप्टोकरन्सी असल्याचे म्हटले जाणारे डोगेकॉइन देखील 5 दिवसांत सुमारे 20% नी घसरले आहे. सध्या Pi नेटवर्क इतरांना मागे टाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Pi नेटवर्क वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर क्रिप्टोकरन्सी माईन करण्याची परवानगी देतो. 2019 मध्ये स्टॅनफोर्ड पदवीधरांनी पाय नेटवर्क लाँच केले. तेव्हापासून या कन्सेप्टला ब्लॉकचेन प्रोजेक्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. Binance, CoinDCX, OKX आणि Bitget सारख्या प्रमुख एक्सचेंजेसवर Pi च्या लिस्टिंगमुळे वापरकर्त्यांना प्रथमच त्यांचे होल्डिंग्ज विकण्याची परवानगी मिळाली.