PAN 2.0 Project: QR कोड असलेल्या पॅन कार्डला सरकारने दिली मान्यता, करदात्यांना मिळतील अनेक लाभ 

HIGHLIGHTS

PAN कार्ड आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी एक आवश्यक दस्तऐवज आहे.

नवीन PAN 2.0 प्रकल्पात तुमचे पॅन कार्ड पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट, जलद आणि अधिक सुरक्षित असेल.

PAN 2.0 च्या सर्वात रोमांचक फीचर्सपैकी एक म्हणजे पॅन कार्डवर 'QR कोड'चा परिचय

PAN 2.0 Project: QR कोड असलेल्या पॅन कार्डला सरकारने दिली मान्यता, करदात्यांना मिळतील अनेक लाभ 

PAN 2.0 Project: आपणा सर्वांना माहितीच आहे की, पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच PAN नंबर हा आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी एक आवश्यक दस्तऐवज आहे. कर भरणे असो किंवा बँक खाते उघडणे असो, प्रत्येक सरकारी कामात PAN कार्ड तुमच्या सोबत असणे खूप महत्त्वाचे असते. दरम्यान आता PAN कार्डबद्दल एक नवीन माहिती पुढे आली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

दरम्यान सरकाने आता एक नवीन नियोजन केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचे पॅन कार्ड पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट, जलद आणि अधिक सुरक्षित असेल, सरकारने नवीन PAN 2.0 प्रकल्पात नेमके हेच नियोजित केले आहे. अलीकडेच, आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA)’ ने या प्रोजेक्टला मंजुरी दिली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या प्रोजेक्टचे बजेट 1,435 कोटी रुपये इतके होते.

Pan Card
Pan Card

Also Read: नवा बजेट फोन TECNO POP 9 ची पहिली Sale अखेर भारतात सुरु, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

PAN 2.0

PAN 2.0 हे विद्यमान PAN/TAN इकोसिस्टमची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. ही करदात्यांचा डिजिटल अनुभव वाढवण्यासाठी आणि सोपे करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक ई-गव्हर्नन्स उपक्रम आहे, ज्याचा उद्देश करदाता नोंदणी सेवांच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याचा आहे. पॅन 2.0 कोर आणि अतिरिक्त पॅन-संबंधित ऍक्टिव्हिटीज, जसे की पॅन प्रमाणीकरण सेवा इ. मध्ये तंत्रज्ञान-चालित परिवर्तन दिसेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, करसंबंधित सेवा अधिक कार्यक्षम आणि प्रत्येकासाठी सुलभ बनविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

pan 2.0 project

PAN 2.0 च्या सर्वात रोमांचक फीचर्सपैकी एक म्हणजे पॅन कार्डवर ‘QR कोड’चा परिचय होय. सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल सिस्टममध्ये पॅन हे एक समान ओळखकर्ता (कॉमन आयडेंटिफायर) बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. एवढेच नाही तर, PAN 2.0 प्रकल्प करदात्यांना अनेक फायदे प्रदान करेल. ज्यामुळे ते केवळ अपग्रेडच नाही तर डिजिटल इंडिया चळवळीतील एक मोठे पाऊल ठरेल. लाभ पुढीलप्रमाणे:

  • सर्व्हिसेसममधील वेग: नवीन पॅन/टॅन कार्ड अर्ज करताना किंवा अपडेट करताना जलद आणि चांगली सर्व्हिस कॉलिटी मिळेल.
  • कंसिस्टन्सी आणि एक्युरेसी: हे ‘सिंगल सोर्स ऑफ ट्रुथ’ सारखे कार्य करेल.
  • इकोफ्रेंडली आणि परवडणारे: या नवीन प्रक्रियांमुळे पेपरवर्क कमी होईल, ज्यामुळे ते अधिक पर्यावरणपूरक आणि किफायतशीर होईल.
  • सिक्योरिटी इंफ्रास्ट्रक्चर: अपग्रेड केलेल्या सिस्टमसह तुमचा डेटा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि जलद होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo