प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मीता Tecno ने आपला नवा TECNO POP 9 स्मार्टफोन भारतीय बाजारात अलीकडेच लाँच केला. दरम्यान, आज म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी या नवीनतम स्मार्टफोनची भारतात पहिली विक्री आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, कंपनी बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नवीनतम फोनदेखील बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Helio G50 प्रोसेसर, व्हर्च्युअल रॅम आणि 13MP कॅमेरा यांसारखी उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध आहे. जाणून घेऊयात TECNO POP 4 ची किंमत आणि ऑफर्स-
नविनतम Tecno Pop 9 ची मूळ किंमत 6,699 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. परंतु डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन Amazon वरून 6,499 रुपयांना खरेदी करता येईल. हे ग्लिटरी व्हाइट, लाइम ग्रीन आणि स्टारट्रेल ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहेत. Buy From Here
TECNO POP 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
TECNO POP 4 या डिव्हाइसमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1612 x 720 पिक्सेल इतके आहे. जलद आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी, मोबाईल फोनमध्ये MediaTek Helio G50 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 Go वर आधारित HiOS वर कार्य करेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 3GB रॅम, व्हर्च्युअल रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे, जे 1TB पर्यंत वाढवता येईल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी TECNO POP 9 मोबाइल फोनमध्ये 13MP कॅमेरा आहे, तर समोर 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, 4G VoLTE, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन देखील उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile