आम्ही तुम्हाला दर आठवड्याच्या सुरुवातीला नवीन OTT रिलीजबद्दल माहिती देत असतो. नेहमीप्रमाणेच OTT प्रेक्षकांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. विशेषतः लोकप्रिय आणि प्रसिद्ध वादग्रस्त शो Bigg Boss OTT 2 या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर सुरु होत आहे. बघुयात OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि सिरीजची यादी.
Bigg Boss OTT चा दुसरा सीजन पुन्हा एकदा OTT वर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण हा शो या आठवड्यातच सुरू होणार आहे. या शो चा पहिला सिझन दिग्दर्शक करन जोहरने होस्ट केला होता. मात्र, अभिनेता सलमान खानच्या नावाने टीव्हीवर हा शो प्रसिद्ध आहे. त्यानंतर आता OTT वर देखील हा शो सलमानच होस्ट करणार आहे. हा शो JioCinema वर 17 जूनपासून सुरु होईल.
हॉलिवूड सुपरस्टार ख्रिस हेम्सवर्थचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट 'एक्सट्रॅक्शन 2' रिलीजसाठी सज्ज आहे. एक्सट्रॅक्शन 2 चा टीझर आणि ट्रेलर जेव्हापासून सोशल मीडियावर आला तेव्हापासून ' एक्सट्रॅक्शन 2' ट्रेंडमध्ये आहे. चित्रपट 15 जून रोजी Netflix वर रिलीज केला जाईल.
जी कारदा वेब सीरिजमध्ये सात मित्रांची कथा दाखवण्यात येणार आहे. ज्यांना आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे. या सिरीज 15 जूनपासून Amazon Prime Video वर सुरु होईल.
नावावरूनच समजते की, आय लव्ह यू हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात रोमान्स, सस्पेन्स आणि ड्रामा यांचा उत्तम मिलाफ असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट JioCinema वर 16 जून रोजी प्रदर्शित होईल.