काय आहे कॉल मर्जिंग Scam?
आजकाल जिकडे तिकडे सामान्य जनता ऑनलाईन फसवणूक, घोटाळे इ. चा बळी ठरत आहे. त्यामध्ये सरकारने आता प्रत्येक ठिकाणी स्कॅमपासून सावध राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तरीही वेगवेगळे नवनवीन स्कॅम बाजारात येत आहेत. सध्या कॉल मर्जिंग Scam ची चर्चा सर्वत्र सुरु ऐकायला मिळत आहे. होय, फक्त एका कॉलद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.
Also Read: मस्तच! दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह भारतात Vivo T4x 5G लाँच, स्वस्तात कॅमेरासह मिळेल रिंग लाईट
नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने देखील या घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा जारी केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात कॉल मर्जिंग स्कॅम आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय-
वर सांगितल्याप्रमाणे, नुकतेच NPCI ने या नव्या स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. होय, NPCI ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत नव्या घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सध्या एक नवीन घोटाळा सुरू झाला आहे.
यामध्ये स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या ओळखीचे कोणीतरी आहेत, असा दावा करतात. ते मित्र किंवा कुटुंबातील सदस्य आहेत, असे सांगतात. पुढे ज्या मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने तुमचा नंबर दिला होता, त्याच व्यक्तीकडून तुम्हाला फोन येत ते असे सांगून आता ते तुम्हाला कॉल्स लवकर मर्ज करण्यास सांगतील.
लक्षात घ्या की, हा कॉल तुमच्या कोणत्याही मित्राचा नसेल तर तो व्हॉइस OTP कॉल असणार आहे. तुम्ही कॉल्स मर्ज करताच, स्कॅमरला OTP ऐकू येईल. त्यानंतर तुम्हाला काय सुरु आहे, हे समजण्याच्या आत स्कॅमरद्वारे तुमचे बँक खाते रिकामे झालेले असेल.