UPI Update 2025 - Unified Payment Interface (UPI)
New UPI Rule: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच न्यूमेरिक UPI ID सोल्यूशनवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश UPI नंबरशी जोडलेल्या पेमेंटसाठी ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करणे होय. महत्त्वाचे लक्षात घ्या की, नवीन मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच नवे नियम 1 एप्रिलपासून लागू होतील. मत्त्वाचे लक्षात घ्या की, UPI मेम्बर्स बँक, UPI ऍप्स आणि थर्ड पार्टी प्रोव्हायडर्ससाठी या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
UPI सेवा वापरणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला त्याच्या बँकेत नोंदणीकृत मोबाइल नंबर सक्रिय असल्याची खात्री करून घेणे, आवश्यक आहे. जर बँकेचे रेकॉर्ड योग्य मोबाईल नंबरसह अपडेट केले गेले, तरच UPI सेवा कोणत्याही अडथड्याशिवाय वापरता येईल.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डीऍक्टिव्हेटेड मोबाइल नंबरशी जोडलेले UPI ID देखील डी-ऍक्टिव्हेट होतील. जर कोणत्याही UPI युजर्सच्या बँकेत नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर बराच काळ निष्क्रिय असेल, तर वापरकर्त्याचा UPI ID देखील अनलिंक केला जाईल आणि वापरकर्ता UPI सर्व्हिस वापरू शकणार नाही.
दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार, डिस्कनेक्ट झाल्यानंतर 90 दिवसांनंतर मोबाईल नंबर नवीन वापरकर्त्याला असाइन केला जाऊ शकतो. जर एखाद्या ग्राहकाचा मोबाईल नंबर कॉल, मेसेज किंवा डेटासाठी वापरला जात नसेल, तर टेलिकॉम प्रोव्हायडर्सकडून तो नंबर निष्क्रिय केला जातो.