अरे व्वा! फक्त 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत तब्बल 20+ OTT आणि 300+ टीव्ही चॅनेलची मज्जा, ‘येथे’ मिळेल सर्व काही
Streambox Media ने Dor Play हे एक ऑल-इन-वन एंटरटेनमेंट ऍप लाँच केले आहे.
Dor Play अॅपची सबस्क्रिप्शन किंमत 399 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल 20+ पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन उपलब्ध
सिनेरसिक आणि OTT लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Streambox Media ने Dor Play हे एक ऑल-इन-वन एंटरटेनमेंट ऍप लाँच केले आहे. या अॅपमध्ये एकाच वेळी एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल 20+ पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यामध्ये 300 हून अधिक टीव्ही चॅनेलचा ऍक्सेस देखील दिला जात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीने डोर टीव्ही OS आणि 24 OTT ऍप्सपर्यंत ऍक्सेससह भारतातील पहिली सबस्क्रिप्शन-आधारित टेलिव्हिजन सर्व्हिस सुरु केली.
Also Read: Jio Plans Under 300: दररोज 1.5GB डेटासह मिळतील Unlimited बेनिफिट्स, पहा यादी
आम्ही तुम्हाला सांगतो की, या अॅपची सबस्क्रिप्शन किंमत 399 रुपये आहे. 399 रुपयांमध्ये तुम्ही तीन महिन्यांसाठी हे ऍप वापरण्यास सक्षम असाल. चला तर मग जाणून घेऊयात Dor Play मध्ये मिळणारे OTT सबस्क्रिप्शन आणि TV चॅनेल्स-
Dor Play मिळणारे OTT सब्स्क्रिप्शन्स
मोबाईल ओन्ली सर्व्हिस Dor Play मध्ये वापरकर्त्यांना प्रसिद्ध आणि लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा लाभ मिळेल. यामध्ये Disney+Hotstar, Zee5, Sony LIV, Lionsgate Play, Sun Nxt, Aha, Discovery+, Fancode, ETV Win, Chaupal, Dollywood Play, Nammaflix, ShemarooMe, Stage, Sun NXT, TravelXP, Raj TV, VR OTT, Playflix, OTT Plus आणि DistroTV सारख्या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. त्याबरोबरच, वर सांगितल्याप्रमाणे, 300 हून अधिक टीव्ही चॅनेलचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.
ऍपबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, या अॅपला चांगला अनुभव देण्यासाठी ‘ट्रेंडिंग’ आणि ‘अपकमिंग’ हे दोन सेक्शन देखील उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर, मूड बेस्ड फिल्टर तुमच्या भावनांवर आधारित सर्वोत्तम कंटेंट सुचवतात. त्याबरोबरच, तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्या किंवा कलाकारांवर आधारित सर्च देखील करू शकता. यासह, तुमच्या आवडीचा कंटेंट तुम्हाला देण्यासाठी आणि तुमच्या मनोरंजनासाठी Dor Play सज्ज आहे.
उपलब्धता
तुम्ही लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून Dor Play ऍपचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. लक्षात घ्या की, हे सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक कूपन मिळेल. याद्वारे तुम्ही मोबाईल नंबरद्वारे सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह करू शकता. त्याबरोबरच, iPhone वापरकर्ते Apple App स्टोअरला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी Google Play स्टोअरवर उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile