Jio Plans Under 300: दररोज 1.5GB डेटासह मिळतील Unlimited बेनिफिट्स, पहा यादी 

HIGHLIGHTS

Jio अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे असलेले अनेक परवडणारे प्लॅन ऑफर करते.

रिलायन्स Jio च्या 300 रुपयांअंतर्गत येणाऱ्या प्लॅन्सची यादी

या यादीत Jio चा 199 रुपयांचा प्लॅन सर्वात परवडणारा प्लॅन आहे.

Jio Plans Under 300: दररोज 1.5GB डेटासह मिळतील Unlimited बेनिफिट्स, पहा यादी 

Jio Plans Under 300: मागील वर्षी जुलैपासून Jio सह सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे युजर्सना काही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या वापरकर्त्यांच्या संख्येत देखील लक्षणीय घट झाली आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio अजूनही अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे असलेले अनेक परवडणारे प्लॅन ऑफर करते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या 300 रुपयांअंतर्गत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. या श्रेणीत तीन जिओ प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहेत. पाहुयात यादी-

Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 300 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या प्लॅनमध्ये 199 रुपयांचा प्लॅन सर्वात परवडणारा प्लॅन आहे. प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS ऑफर करतो. या प्लॅनची वैधता एकूण 18 दिवसांची आहे. म्हणजेच, या वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 27GB डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच, वापरकर्त्यांना अनेक मोफत Jio ऍप्सचा ऍक्सेस मिळेल.

jio plans

Jio चा 239 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 22 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. त्याबरोबरच, या मोफत देशात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 33GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, भारतातील कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100SMS ची सुविधा देखील यात उपलब्ध आहे.

रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

Jio चा 299 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 28 दिवसांची वैधता मिळत आहे.बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा मिळतो, जो महिन्यासाठी एकूण 42GB डेटा लाभ देतो. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ आणि Jio ऍप्सचा लाभ देखील मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo