New Aadhaar App: आधार कार्डबद्दल एक मोठी बातमी पुढे आली आहे. आता तुम्हाला हॉटेल, दुकाने, एअरपोर्ट किंवा इतर कोणत्याही ठिकाणी Aadhaar कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज नाही. डिजिटल क्रांतीचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी आणि लोकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारने मंगळवारी एक मोठे पाऊल उचलले. होय, आम्ही तुम्हाला सांगतो की, सरकारने आता नवीन Aadhaar ऍप लाँच केले आहे.
हे अॅप केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लाँच केले. आधार सुरक्षित, सोपे आणि वापरकर्ता-नियंत्रित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी वर्णन केले. या ऍपच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे आधार तपशील डिजिटल पद्धतीने पडताळण्यास सक्षम असतील आणि शेअर करू शकतील. यामुळे आधार कार्ड किंवा त्याची फोटोकॉपी दाखवण्याची गरज उरणार नाही.
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Motorola Edge 60 Fusion ची पहिली सेल आज, मिळेल जबरदस्त Discount
नव्या App मध्ये चेहऱ्याद्वारे ओळख पडताळणी म्हणजेच फेस ID ऑथेंटिकेशन करता येईल. हे ऍप लाँच केल्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आधार पडताळणी सोपे, जलद आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वैष्णव यांनी X म्हणजेच ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मॅसेजमध्ये म्हटले की, “नवीन आधार ऍप, मोबाईल ऍपद्वारे फेस ID प्रमाणीकरण, ना प्रत्यक्ष कार्ड, ना फोटोकॉपी. आता फक्त एका टॅपने, वापरकर्ते आवश्यक डेटा शेअर करू शकतात. ज्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक माहितीवर पूर्ण नियंत्रण मिळेल. या ऍपच्या सर्वात प्रमुख फीचर्सपैकी एक म्हणजे फेस आयडी ऑथेंटिकेशन, जे सुरक्षितता वाढवते आणि व्हेरिफिकेशन अधिक सुलभ करेल.”
याव्यतिरिक्त, आधार पडताळणी आता फक्त UPI पेमेंटप्रमाणेच QR कोड स्कॅन करून करता येईल. युजर्स आता त्यांची गोपनीयता सुनिश्चित करून त्यांचे आधार तपशील डिजिटल पद्धतीने व्हेरिफाय आणि शेअर करू शकतात. हे ऍप सध्या बीटा चाचणी टप्प्यात आहे. हे मजबूत गोपनीयता सुरक्षा उपायांसह डिझाइन केलेले आहे. लवकरच ऍप रोल आऊट केले जाईल, अशी अपेक्षा आहे.