दिवाळी सेल ऑफर: मोटोरोला आपल्या सर्व फोन्सवर देत आहे जबरदस्त सूट

Updated on 09-Nov-2015
HIGHLIGHTS

ह्या सेलमध्ये मोटो G 3 जनरेशनचे दोन 8GB आणि 16GB मॉडेल १००० रुपयांच्या सूटमध्ये सामील आहेत. तेथेच एक्सचेंज ऑफरमध्ये ह्यावर अतिरिक्त ५००० रुपयाची सूट दिली जात आहे.

मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने ह्या दिवाळीत खूप चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. खरे पाहता, कंपनीने हॅपी दिवाळी सेलची सुरुवात केली आहे, ज्या अंतर्गत मोबाईल फोनच्या खरेदीवर असंख्य सूट दिली जात आहे. हा सेल ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत चालेल. हॅपी दिवाळी सेलमध्ये फोनमध्ये सूटसह एक्सचेंज ऑफरसुद्धा देत आहेत. कंपनीची एक्सचेंज ऑफर मोटो E 2 जनरेशनच्या दोन मॉडेल आणि मोटो G 2 जनरेशनला सोडून सर्वांवर आहे.

 

हॅपी दिवाळी सेलमध्ये फोनमध्ये कंपनी त्या मोबाईल्सवर सूट देत आहे, जे हल्लीच लाँच केले गेले आहे. ह्या सेलमध्ये मोटोरोला मोटो X प्ले आणि मोटोरोला मोटो X स्टाइल यांचा समावेश आहे.

ह्या सेलमध्ये मोटो G 3 जनरेशनचे दोन 8GB आणि 16GB मॉडेल १००० रुपयांच्या सूटमध्ये सामील आहेत. तेथेच एक्सचेंज ऑफरमध्ये ह्यावर अतिरिक्त ५००० रुपयाची सूट दिली जात आहे.

ह्या सेलमध्ये मोटोरोला नेक्सस 6 डिवाइस ५,००० रुपयाच्या सूटसह २४,९९९ रुपयांत मिळत आहे आणि एक्सचेंज ऑफरमध्ये ह्यावर १०,००० रुपयाची सूट दिली जात आहे. तेथेच मोटो टर्बोसाठी १५,००० रुपयाची एक्सचेंज ऑफर सादर केली आहे. हा फोन ३१,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

हॅपी दिवाळी सेलमध्ये मोटोरोला मोटो X स्टाइलची किंमत कमी केली नाही. मात्र एक्सचेंज ऑफरमध्ये ह्यावर १५,००० रुपयापर्यंतची सूट दिली आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :