दर वर्षी आज म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
प्रियजनांना तसेच मित्र-मैत्रिणींना Marathi Bhasha Din 2025 च्या शुभेच्छा WhatsApp द्वारे द्या.
WhatsApp द्वारे पुढील शुभेच्छा देऊन प्रियजनांना मायबोलीचे संदेश द्या.
Marathi Bhasha Din 2025 शुभेच्छा
Marathi Bhasha Din 2025 शुभेच्छा: दर वर्षी आज म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा अभिमान दिन म्हणून संबोधले जाते.आपणा सर्वांना माहितीच आहे की, अलीकडेच आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाळकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. लक्षात घ्या की, मराठी भाषा दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे मराठी भाषेचा प्रचार करणे होय.
तुम्ही तुमच्या प्रियजनांना तसेच मित्र मैत्रिणींना Marathi Bhasha Din 2025 च्या शुभेच्छा WhatsApp द्वारे देऊ शकता. तसेच, मायबोलीचे संदेश देखील देऊ शकता. मराठी गौरव दिनाच्या खास शुभेच्छा पुढीलप्रमाणे:
Marathi Bhasha Din 2025 च्या शुभेच्छा
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!
मराठी बोलुया, मराठी वाचुया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
‘गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा’, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
जात मराठी,धर्म मराठी, शान मराठी, अभिमान मराठी!
अभिमानाने बोलुयात मराठी, अभिमानाने जगूयात मराठी, मायबोली गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी! मराठी भाषा अभिमान दिनाच्या शुभेच्छा!
पाहुणे असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी! मराठी भाषा अभिमान दिनाच्या शुभेच्छा!
मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजेच आपुलकी! मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा.
फुलवू मराठी, रुजवू मराठी, चला बोलू फक्त मराठी!
जगण्यासाठी जरीही असेल इतर भाषांची गरज, पण ठेच लागल्यावर येते ‘आई गं’ ती आपली मायबोली! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi Bhasha Din 2025 चे शुभेच्छा स्टेटस
माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी खरे रसिके मेळवीन।
मराठी माझी जात, मराठी माझा धर्म, मराठी माझी माती, मराठी माझा रक्त। मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा.
बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी। मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.
मायबोली माझी मराठी तिच्यात आहे मायेचा ओलावा, वेगवेगळ्या शब्दालंकारात घेते हृदयातील खोलावा.
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर. सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
WhatsApp स्टेटससाठी व्हीडिओ डाउनलोड करा.
सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या Marathi Bhasha Din 2025 च्या आवडलेल्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
त्यानंतर गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यासाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स मिळतील.
एखादी योग्य साईट निवडून ओपन करा आणि तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.
वरील अगदी सोप्या प्रक्रियेने तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करू शकता. हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल. त्यानंतर, तुम्ही गॅलरीमधून हा व्हीडिओ WhatsApp स्टेटसला ठेऊ शकता. ‘अशा’प्रकारे स्टेटसद्वारेMarathi Bhasha Din 2025 च्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा.
वरील सर्व मराठी शुभेच्छा देऊन तुम्ही आपल्या प्रियजनांना मराठी भाषा दिनाचे आणि मायबोलीचे संदेश देऊ शकता. आमच्या सर्व वाचकांना ‘डिजिट मराठी’ कडून मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.