Maharashtra Elections 2024: How to cast vote without voter id card 2024
Maharashtra Elections 2024: अखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदार 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की, मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर ID कार्ड असणे आवश्यक आहे. पण, ऐन मतदानाच्या दिवशी तुमचे वोटर आयडी हरवले तर काय? तुम्ही मतदान कसे करणार? काळजी करू नका. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला वोटर ID ऐवजी मतदानासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांबद्दल माहिती देणार आहोत.
मतदार मतदानासाठी तयार होताना मतदान केंद्रावर आवश्यक कागदपत्रे नेणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे देखील तपासून घ्यावे. जे मतदार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन केले जाऊ शकते. Maharashtra Election 2024: ‘अशा’प्रकारे ऑनलाईन पद्धतीने मतदार स्लिप डाउनलोड करा, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर त्यांचे मतदार ओळखपत्र (Voter ID), मतदार माहिती (Voter Slip) स्लिप आणि फोटो ID प्रूफ सोबत ठेवणे, आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते की, मतदार मतदान करण्यासाठी फोटो आयडेंटिटी EPIC व्यतिरिक्त 12 मान्यताप्राप्त ओळख पुराव्यांपैकी कोणतेही वापरू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एप्रिलमध्ये ECI ने लोकसभा निवडणुकीसाठी अशीच घोषणा केली होती.