Moto pad 60 Pro जबरदस्त टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्वोत्तम फीचर्स

Updated on 17-Apr-2025
HIGHLIGHTS

Moto pad 60 PRO नवीनतम टॅबलेट भारतीय बाजारात लाँच

विशेष म्हणजे हा मोटोरोला टॅबलेट Moto Pen Pro सोबत येतो.

क्रॉस कंट्रोलमुळे वापरकर्ते त्यांचे टॅबलेट PC वापरून सहजपणे ऑपरेट करू शकतात.

Motorola ने नवीन टॅबलेट Moto pad 60 PRO भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या या नवीनतम टॅबलेटमध्ये मोठा डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टॅबलेट केवळ PANTONE Bronze Green मध्ये येतो. चला तर मग जाणून घेऊयात मोटोरोलाच्या नवीन Moto pad 60 Pro टॅबलेटची किंमत आणि सर्व फीचर्स-

Also Read: Launched! अखेर Samsung Galaxy M56 5G फोन भारतात लाँच, पहा किंमत आणि सर्व स्पेक्स

Moto pad 60 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Moto pad 60 Pro ने हा टॅबलेट 26,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ही त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे. त्याच वेळी, 12GB रॅम आणि 256 स्टोरेज व्हेरिएंट 28,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, लाँच ऑफरसह हा टॅबलेट 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 23 एप्रिल 2025 पासून Flipkart वर सुरू होईल.

Moto pad 60 Pro चे फीचर्स आणि स्पेक्स

Moto pad 60 PRO स्मार्टफोनमध्ये 12.7 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 3k आहे आणि रिफ्रेश रेट 144Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या टॅब्लेटमध्ये ऑक्टा कोर 4nm डायमेन्सिटी 8300 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या या टॅबलेटमध्ये 12GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. हा मोटोरोला टॅबलेट JBL स्पीकर्स सिस्टम आणि डॉल्बी ATMOS सपोर्टसह येतो.

विशेष म्हणजे हा मोटोरोला टॅबलेट Moto Pen Pro सोबत येतो. कंपनीने म्हटले की, क्रॉस कंट्रोलमुळे वापरकर्ते त्यांचे टॅबलेट PC वापरून सहजपणे ऑपरेट करू शकतात. फाइल ट्रान्सफर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसेसमध्ये सहजपणे फाइल्स शेअर करण्याची परवानगी देते. पॉवर बॅकअपसाठी, टॅबलेटमध्ये 10,200mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये वाय-फाय 6E 802.11 ax, ब्लूटूथ v5.3 आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :