जगप्रसिद्ध टेक जायंट Apple ने अलीकडेच आपले नवे उपकरण भारतात लाँच केले. होय, iPad Air (2025) आणि 11व्या जनरेशनमधील iPad (2025) अलीकडेच भारतात लाँच करण्यात आले. त्यानंतर, 12 मार्चपासून भारतात या उपकरणांची विक्री सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPad Air 11 इंच आणि 13 इंच अशा दोन स्क्रीन आकारात उपलब्ध आहे. याशिवाय, यात Apple M3 चिप आहे. चला तर मग जाणून घेऊयात iPad Air (2025) आणि iPad (2025) किंमत, ऑफर्स आणि फीचर्स-
Also Read: Best Offers! ‘या’ Vivo स्मार्टफोनने तुमच्या बायकोला घेता येईल जबरदस्त सेल्फी, मिळतो 50MP फ्रंट कॅमेरा
Apple कंपनीने iPad Air (2025) ची 59,900 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. त्याबरोबरच, Wi-Fi + सेल्युलरचे एक मॉडेल देखील त्यात समाविष्ट आहे. या मॉडेलची किंमत 74,900 रुपये इतकी आहे. 13 इंच लांबीच्या वाय-फाय मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. दुसरीकडे, Wi-Fi + सेल्युलर मॉडेलची किंमत 94,900 रुपये इतकी आहे. हे उपकरण ब्लू, पर्पल, स्पेस ग्रे आणि स्टारलाईट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, iPad Air (2025) Wi-Fi मॉडेलची किंमत 34,900 रुपये आहे. त्याच वेळी, Wi-Fi + सेल्युलर मॉडेल 49,900 रुपयांना आला आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही मॉडेल्सची विक्री आज 12 मार्चपासून भारतात सुरू होत आहे. तुम्ही ते Apple च्या साईटवरून खरेदी करण्यास सक्षम असाल. हा टॅब ब्लु, व्हाईट, सिल्वर आणि येलो कलर ऑप्शन्समध्ये सादर करता येईल.
iPad Air (2025) मध्ये 11-इंच लांबीचा लिक्विड रेटिना LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅब 13 इंच लांबीचे मॉडेल देखील उपलब्ध आहे. परफॉर्मन्ससाठी, या आयपॅडमध्ये Apple M3 चिप आहे. तसेच, ते iPadOS 18 वर देखील कार्य करतो. विशेष म्हणजे यात अॅपल इंटेलिजेंस फीचर्सचा ऍक्सेस आहे. कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी यात 12MP कॅमेरा आहे. यासोबतच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
iPad (2025) बद्दल बोलायचे झाले तर, त्यात 10.9 इंच लांबीचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. याशिवाय, हा आयपॅड A16 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, हा आयपॅड मागील मॉडेलपेक्षा 30% वेगवान आहे. तसेच, हे iPad iPadOS 18 वर देखील कार्य करतो. मात्र, कंपनीला या आयपॅडमध्ये Apple इंटेलिजेंस फीचर्सची सुविधा नाही. पॉवर बॅकअपसाठी, या टॅबची बॅटरी 28.93Wh आहे.