Ladki Bahin Yojna Installment: आपणा सर्वांना माहितीच आहे की, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिंदेसरकार असताना ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख आणि त्यापेक्षा असल्यास कुटुंबातील बहिणींच्या बँक खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. दरम्यान, आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एक महत्त्वाचे अपडेट पुढे आले आहे.
या योजनेअंतर्गत, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी पाहण्याचा हप्ता मिळाला नव्हता. त्यांना या महिन्यात डबल गिफ्ट मिळणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार आहे. अशाप्रकारे, लाडक्या बहिणींना या महिन्यात एकूण 3000 रुपये मिळतील.
Also Read: Farmer ID: शेतकरी बांधवांसाठी खुशखबर! हा कार्ड बनविल्यापासून मिळणार महत्त्वाचे फायदे
महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डल द्वारे पोस्ट शेअर करत वर लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल अपडेट दिले आहे. या महिन्याचा निधी आज म्हणजेच 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा होईल. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, हे तपासण्यासाठी पुढील सोपी प्रक्रिया फॉलो करा.
तुमचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे ऑनलाईन तपासण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा:
याव्यतिरिक्त, तुम्ही ATM द्वारे बॅलेन्स चेक करू शकता, बँक पासबुक अपडेट करून बॅलेन्स चेक करू शकता, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ऍपद्वारे ट्रांजेक्शन हिस्ट्री चेक करून तुम्ही खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता.
याशिवाय, तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे तुमच्या गावातील आणि शहरातील शासकीय मदत केंद्रात जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही, हे तपासून घेऊ शकता.