Amazon Prime Day Sale 2022: सेलपूर्वी सर्व प्रकारच्या सवलती, डील्स आणि ऑफर जाणून घ्या

Updated on 21-Jul-2022
HIGHLIGHTS

Amazon Prime Day Sale 2022 23 आणि 24 जुलै रोजी होणार

सेलमध्ये आकर्षक ऑफर्स आणि डिल्स मिळणार

चला तर जाणून घेऊयात ऑफर्स आणि सवलतींबद्दल सविस्तर माहिती

Amazon Prime Day Sale 2022 अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. सेल 23 जुलैपासून सुरू होणार आहे, त्यानंतर हा सेल 24 जुलैपर्यंत चालणार आहे. या सेल दरम्यान, जर तुम्ही Amazon प्राइम मेंबर असाल, तर तुम्हाला काय खरेदी करायचे आहे हे तुम्ही निश्चित केले असेल. या लेखात आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट डील आणि सवलती इत्यादींची संपूर्ण यादी घेऊन आलो आहोत. जेणेकरून सेलदरम्यान खरेदीची प्रक्रिया तुमच्यासाठी आणखी सुलभ होईल. 

 तुम्ही Amazon India च्या वेबसाईटला भेट द्याल, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळू शकतात. जाणून घेऊयात सर्व प्रकारच्या सवलती, डील्स आणि ऑफरबाबत सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : Samsung आणतोय 200MP कॅमेरा असलेला पावरफुल फोन, Motorola आणि Xiaomi शी होणार स्पर्धा

AMAZON PRIME DAY SALE 2022 वर विविध सवलती आणि डिल्स

प्राइम डे सेल दरम्यान तुम्हाला पुढील डिल्स आणि सवलतींचे लाभ घेता येईल:

> Wow Deals : ही लिमिटेड टाइम ऑफर प्राइम डे सेल दरम्यान दररोज दुपारी 2 ते संध्याकाळी 6 दरम्यान होणार आहे.

> Bank offers : तुमच्याकडे ICICI बँक किंवा SBI बँक कार्ड असल्यास, तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच तुम्हाला 500 रुपयांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.

> Amazon Coupons : यासाठी तुम्हाला कूपन बॉक्स चेक करावा लागेल, असे केल्याने तुम्हाला अतिरिक्त सूट मिळणार आहे. जो चेकआउटच्या वेळी तुम्हाला दिसेल.

> Amazon Combos : या अंतर्गत तुम्हाला दोन वस्तूंच्या खरेदीवर सुमारे 5 टक्के आणि तीन वस्तूंच्या खरेदीवर 10 टक्के सूट मिळू शकते.

> Prime Day Launches : यात असेदेखील प्रोडक्ट्स असणार आहेत, जे प्रथमच Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असतील.

फक्त एक रुपयात Pre-Booking : तुम्ही फक्त एक रुपयात प्रोडक्ट प्री-बुक करू शकता, त्यानंतर तुम्हाला ते सेल प्राईसमध्ये सहज मिळतील.

> Shop Win, Every Hour : हा एक लकी ड्रॉ आहे ,जिथे 500 ग्राहकांना दर तासाला आकर्षक प्राईज मिळणार आहेत.

> Advantage just for Prime : प्राइम मेम्बर्सना 6 महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर मिळणार आहे, याशिवाय तुम्ही HDFC बँक कार्ड्सवर 3 महिन्यांपर्यंतच्या अतिरिक्त नो-कॉस्ट EMI चा लाभ घेऊ शकता.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :