चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.
India Vs New Zealand सामना तुम्हाला फोनवरच पाहता येईल.
तुम्ही JioHotstar चे सब्स्क्रिप्शन खरेदी करून हा सामना लाईव्ह पाहू शकता.
India Vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. जर तुम्हालाही हा सामना LIVE पहायचे असेल तर, आम्ही तुम्हाला सोपी प्रक्रिया सांगणार आहोत. यासह तुम्ही ऑनलाइन सामने सहज पाहण्यास सक्षम असाल. आम्ही तुम्हाला सांगतो की, JioHotstar च्या मदतीने तुम्ही सामना ऑनलाइन पाहू शकता.
यासह तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन, टॅबलेट आणि स्मार्ट टीव्हीवर सामना ऑनलाइन पाहता येईल. पण कधीकधी जेव्हा तुम्ही टीव्हीभोवती नसता, तेव्हा तुम्ही सामना ऑनलाइन मोबाईलवरच पाहणे पसंत करता. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात मोबाईलवर ऑनलाईन सामने कसे पाहता येईल.
Android Users ‘अशा’ प्रकारे ऑनलाईन मॅच पाहू शकतात:
मोबाईल फोनवर मॅच पाहण्यासाठी सर्वप्रथम वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.
येथे गेल्यानंतर, त्यांना ‘जियो हॉटस्टार’ वर टॅप करावे लागेल आणि इन्स्टॉल करा.
एकदा ऍप डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यानंतर, ‘ओपन’ ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या Jio आयडीद्वारे लॉग इन करा.
JioHotStar
JioHotstar अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला Continue वर टॅप करावे लागेल.
तुम्हाला ज्या भाषेत मजकूर पाहायचा आहे त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये कंटेंट मिळतो.
येथे तुम्हाला कोणतीही एक भाषा निवडावी लागेल. आता तुम्हाला लॉगिन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता.
तुम्ही मोबाईल नंबरच्या मदतीने सहज लॉगिन करू शकता. मोबाईलवर OTP येईल आणि तुम्हाला तो एंटर करावा लागेल.
आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही लाईव्ह मॅचेस पाहण्यास सक्षम असाल.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ‘वॉच लाईव्ह’ वर जावे लागेल. येथे गेल्यानंतर तुम्ही ते सहजपणे ऑनलाइन फायनल मॅच ऑनलाईन पाहण्यास सक्षम असाल.
iOS फोनवर ‘अशा’प्रकारे पाहता येईल सामना
iPhone वापरकर्त्यांनाही वरील समान प्रक्रिया फॉलो करावी लागेल. iOS युजर्सना देखील आधी अॅप डाउनलोड करण्यासाठी अॅप स्टोअरमध्ये जावे लागेल.
यानंतर ‘JioHotstar’ डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
‘JioHotstar’ ऍप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला वरील प्रमाणे ऍप लॉगिन प्रक्रिया फॉलो करावी लागेल. यानंतर तुम्ही आजची फायनल ऑनलाईन पाहण्यास सक्षम असाल.
तुम्ही JioHotstar चे सब्स्क्रिप्शन खरेदी करून हा सामना लाईव्ह पाहू शकता. JioHotstar सबस्क्रिप्शनची किंमत 49 रुपयांपासून सुरु होते. त्याबरोबरच, तुम्हाला माहितीच आहे की, खाजगी टेलिकॉम कंपन्या म्हणजेच Jio, Airtel आणि VI सारख्या कंपन्या JioHotstar चे सब्स्क्रिप्शन मोफत ऑफर करतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.