कर्जासाठी बँकेच्या फेऱ्या मारणे विसरा! Jan Samarth Portal वर लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा, पहा सोप्या स्टेप्स
अडचण आहे? कर्ज हवे? आता घरबसल्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया करा.
Jan Samarth Portal ला भेट देऊन सहज ऑनलाइन अर्ज देता येईल.
जन समर्थ पोर्टलद्वारे 15 सरकारी योजनांअंतर्गत 7 लोन कॅटेगरीमध्ये कर्ज दिले जाते.
Jan Samarth Portal: आपणा सर्वांना माहितीच आहे की, दररोज हजारो लोक अडचण भागवण्यासाठी बँकांची किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांची दारे ठोठावत असतात. तर, कर्ज प्रक्रिया सुरु झाल्यास सामान्य नागरिकांना रोज काही ना काही प्रक्रिया, कागदपत्रे इ. कारणास्तव फेऱ्या माराव्या लागतात. जर तुम्हाला व्यवसाय, शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी कर्ज घ्यायचे असेल तर, तुम्हाला हे करण्याची आवश्यकता नाही. होय, Jan Samarth Portal ला भेट देऊन सहज ऑनलाइन अर्ज देता येईल.
SurveyAlso Read: नेहमी-नेहमी अर्ज प्रक्रियेचा वैताग आलाय? सरकारने लाँच केले Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल, वाचा डिटेल्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, कर्जाची पात्रता पोर्टलवर तपासता येईल. यासह किती कर्ज मंजूर होईल हे समजते. त्याबरोबरच, किती EMI भरायचा आहे, हे देखील सांगितले जाते. एवढेच नाही तर, कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळेल, किती मिळेल आणि किती वर्षांपर्यंत हप्ते भरावे लागतील इ. सर्व हे सर्व कामे जन समर्थ पोर्टलवर केले जातील.

Jan Samarth Portal
जन समर्थ पोर्टलच्या साईटवर तुम्हाला सर्वप्रथम लोकांना पैसे मागणाऱ्या कॉल, SMS, घोटाळे आणि बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य जनतेच्या सतत होणाऱ्या फसवणुकीमुळे सरकार सतत इशारा देत असते. तुम्ही ऐकतच असाल की, कुठलाही फोन कॉल करण्यापूर्वीच संबंधित व्हॉइस मेसेज तुम्हाला ऐकविण्यात येतो.
Jan Samarth Portal Loan
या पोर्टलवर अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, मुलांसाठी शैक्षणिक कर्ज आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी देखील येथे कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. सर्वप्रथम अर्जदाराने कर्जासाठी पात्र आहे की नाही, हे तपासून घेणे आवश्यक आहे. कर्जासाठी पात्र असल्यास तुम्हाला माहितीच आहे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी काही कागदपत्रे असणे, आवश्यक आहे.
Jan Samarth Portal
लक्षात घ्या की, जन समर्थ पोर्टलद्वारे 15 सरकारी योजनांअंतर्गत 7 लोन कॅटेगरीमध्ये कर्ज दिले जाते.
- जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रथम वेबसाइटवर नोंदणी करा. यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- त्यावर OTP येईल, त्यानंतर तुम्ही नोंदणी करण्यास सक्षम असाल.
- उदा. बिजनेस लोन: जर तुम्हाला नव्या व्यवसायासाठी कर्ज हवा असेल तर, बिजनेस लोन सेक्शनमध्ये जा.
- यानंतर तुम्हाला शिक्षण, व्यवसायाचे स्वरूप, लिंग, श्रेणी याबद्दल माहिती विचारण्यात येईल.
- त्यांनतर शहरी आणि ग्रामीण भागाशी संबंधित एक पर्याय असेल.
- आता तुम्हाला कर्ज हवे असलेल्या प्रकल्पाचा खर्च विचारला जाईल.
- वेबसाइटवर दरमहा किती ईएमआय भरावा लागेल आणि कर्ज किती वर्षांसाठी दिले जाईल हे देखील दाखवले आहे.
‘अशा’प्रकारे इतर लोनसाठी आणि स्कीमबद्दल देखील स्पष्ट आणि डिटेलमध्ये सांगितले गेले आहे. या पोर्टलवर ही प्रक्रिया विना अडथडा म्हणजेच स्मूथ असते. लक्षात घ्या की, जन समर्थ पोर्टलवर सर्व प्रकारची कर्जे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी Jan Samarth Portal ला भेट द्या.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile