Install App Install App

ख-या आयफोनच्या बदल्यात बनावट आयफोन देऊन डिलिवरी बॉयनेच फ्लिपकार्टला घातला ५ लाखांचा गंडा

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 05 Jul 2016
HIGHLIGHTS
  • हा डिलिवरी बॉयने आतापर्यंत १२ आयफोन्सच्या बदल्यात रिप्लेस करण्याच्या बहाण्याने बनावट आयफोन देऊन फ्लिपकार्ट कंपनीला ५ लाखांचा गंडा घातला आहे.

ख-या आयफोनच्या बदल्यात बनावट आयफोन देऊन डिलिवरी बॉयनेच फ्लिपकार्टला घातला ५ लाखांचा गंडा

गेल्या महिन्याभरापासून फ्लिपकार्ट कंपनीच्या डोळ्यात धूळ टाकून अगदी सहजपणे २१ वर्षाच्या ह्या फ्लिपकार्ट डिलिवरी मुलाने १२ आयफोन्स लंपास केले आहेत. या बातमीची दखल घेऊन चेन्नई पोलिसांनी तात्काळ त्या मुलाला अटक केली आहे.   

ह्या आरोपीचे नाव बी. नवीन असून बी कॉम पदवीधर असलेला २१ वर्षांचा मुलगा आहे. हा गेल्या ६ महिन्यापासून फ्लिपकार्टमध्ये डिलिवरी बॉय म्हणून काम करतो. हा चेन्नईमधील आपल्या राहत्या परिसराजवळील भागातील बनावट पत्त्याने आयफोन बुक करायचा. आणि त्याची डिलिवरी तो स्वत: करायचा. मग अगदी शिताफीन त्यातील खरा आयफोन काढून त्यात बनावट आयफोन देऊन पुन्हा फ्लिपकार्टवाल्यांकडे ते प्रोडक्ट रिप्लेससाठी द्यायचा. आणि कंपनीने कारण विचारल्यास तो अगदी सहजपणे कस्टमरने आवडले नसल्यामुळे त्यांंनी रिप्लेससाठी दिले आहे, असे खोटे कारण द्यायचा. असे करत करत त्याने आतापर्यंत १२ आयफोन्स लंपास करुन ५ लाखांची फसवणूक केली आहे.

हेदेखील वाचा - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

मात्र असे गेल्या महिन्याभरापासून पुन्हा पुन्हा होत असल्याचे लक्षात येताच फ्लिपकार्ट कंपनीने पोलिसांची मदत घेऊन ह्या घटनेचा छडा लावला. आणि ह्या गुन्ह्यात नवीन दोषी आढळताच, त्यांनी तात्काळ त्याला अटक केली आहे.

त्यांच्या ऐशो-आरामी लाइफस्टाइलसाठी त्याचा पगार त्याला पुरेसा नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचचल्याचे पोलिसांना कबुली जबाबात सांगितले आहे.


हेदेखील वाचा - भारतात लाँच झाला पॅनासोनिक एलुगा नोट स्मार्टफोन, किंमत १३,२९० रुपये
हेदेखील वाचा - 
ग्लॉसी मेटल बॉडीने सुसज्ज असलेला TCL 560 स्मार्टफोन भारतात लाँच

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
flipkart iphones
DMCA.com Protection Status