जगप्रसिद्ध टेक जायंट Apple ने भारतात iOS 18.4, iPadOS 18.4 आणि macOS Sequoia 15.4 अपडेट्स अखेर जारी केले आहेत. युजर्स या नव्या अपग्रेड्सची प्रतीक्षा दीर्घकाळापासून करत होते. आता iPhone, iPAD आणि Mac वापरकर्ते प्रगत Apple Intelligence फीचर्स वापरू शकतील. या नवीनतम फिचरमुळे संवाद सुधारेल, वापरकर्ते त्यांचे फोटो चांगल्या प्रकारे एडिट करण्यास आणि मेल किंवा मेसेजसना योग्य उत्तरे देण्यास इ. साठी सक्षम असतील. लक्षात घ्या की, नवीन इंटेलिजेंस फीचर्स वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर नवीनतम अपडेट डाउनलोड करावे लागेल. जाणून घेउयात सविस्तर-
Also Read: OnePlus 13R Discount: लेटेस्ट स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट, आकर्षक टॉप 5 फीचर्स
Apple Intelligence या अपडेटचा भाग म्हणून भारतीय iPhone वापरकर्त्यांना रायटिंग टूल्स मिळणार आहेत. या फीचर्सद्वारे लांबलचक मेसेजेसची समरी काढता येईल. क्लीन अप टूलने कोणतीही वस्तू सहजपणे काढता येईल. इमेज प्लेग्राउंड आणि Genmoji देखील उपलब्ध असतील. याद्वारे युजर्स कोणतेही चित्र इमोजीमध्ये कन्व्हर्ट करू शकतील.
ऍप्पल इंटेलिजन्सच्या नवीन अपडेटच्या आगमनाने ChatGPT सपोर्ट आता व्हॉइस असिस्टंट सिरीमध्ये उपलब्ध होईल. या एकत्रीकरणामुळे युजर्सना वेगळे ऍप डाउनलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही. iPhone युजर्स सिरीद्वारे ChatGPT वापरण्यास सक्षम असतील.
Apple ने भारत आणि सिंगापूरसाठी लोकल इंग्रजी भाषा आणली आहे. हे नवे फिचर भारत आणि सिंगापूरच्या आसपासच्या सर्व प्रदेशांमध्ये वापरता येईल. तसेच, इंग्रजी व्यतिरिक्त इतर परदेशी भाषांचे समर्थन देखील मिळेल. यामध्ये फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, जपानी, कोरियन आणि चिनी भाषांचे समर्थन समाविष्ट आहे.
ऍपल इंटेलिजन्स अपडेट अंतर्गत प्रायोरिटी नोटिफिकेशन्स देखील आणले गेले आहेत. या फिचरच्या आगमनाने, महत्त्वाचे मेसेज आणि अपडेट्स आता हायलाइट केले जातील. याद्वारे तुमचा एकही मॅसेज मिस होणार नाही. याशिवाय, लॅंग्वेज फोटो सर्च टूल देखील मिळेल. यासह तुम्ही टेक्स्ट प्रविष्ट करून फोटो शोधू शकता. हे खूप उपयुक्त फीचर्स आहेत, जे Apple Intelligence ने युजर्ससाठी जाहीर केले आहेत.