Digit zero1 awards: ‘हे’ आहेत या वर्षीचे Best buying प्रोडक्ट्स, पहा संपुर्ण यादी

Updated on 18-Jan-2025
HIGHLIGHTS

प्रसिध्द टाइम्स नेटवर्कच्या टेक्नोलॉजी ब्रँड डिजिटने digit zero 1 awards आयोजित केले.

Vivo X100 Pro हा 5G स्मार्टफोन या श्रेणीत सर्वोत्तम आहे.

कंपनी या Poco F6 फोनला पॉवरफुल परफॉर्मर म्हणत आहे.

प्रसिध्द टाइम्स नेटवर्कच्या टेक्नोलॉजी ब्रँड डिजिटने digit zero 1 awards आयोजित केले आहेत. बेस्ट बाईंग प्रोडक्टची यादी देखील तयार केली आहे. तुम्हाला देखील काही नविन उत्पादने खरेदी करायचे असतील, तर तुम्ही ही यादी पाहू शकता-

Premium / Flagship (Over 50k): Vivo X100 Pro

 Vivo X100 Pro हा 5G स्मार्टफोन या श्रेणीत सर्वोत्तम आहे. यात 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित FunTouchOS 14 सह कार्य करतो. फोटोग्राफी वैशिष्ट्यांमध्ये, यात 100x डिजिटल झूमचीही सुविधा आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.

Gaming Laptop (price no bar 250K+): Acer Predator Helios 16

या तैवानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने प्रीडेटर हेलिओस 16 मध्ये अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये दिली आहेत. प्रीडेटर हेलिओस 16 मध्ये, वापरकर्त्यांना नवीनतम i9 प्रोसेसर पाहायला मिळतो. या लॅपटॉपमध्ये अद्भुत वैशिष्ट्ये आहेत आणि त्याची किंमत देखील आश्चर्यकारक आहे. या लॅपटॉपची किंमत 1,99,990 रुपये इतकी आहे.

Wireless Headphones: Sennheiser Accentum Plus

Sennheiser Accentum Plus वायरलेस हेडफोन भारतात 50 तासांच्या बॅटरी बॅकअपसह लॉन्च करण्यात आले. हा हेडफोन ड्युअल ANC, प्रीमियम डिझाइन यासारख्या मजबूत वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, PC इ. कनेक्ट करू शकता. Sennheiser ने भारतात 50 तासांच्या बॅटरी बॅकअपसह वायरलेस हेडफोन लाँच केले आहेत.

Gaming Laptop (151K – 250K): Lenovo Legion Pro 5i

लेनोवो लीजन प्रो 5i हा एक गेमिंग लॅपटॉप आहे. यात 16 इंचाचा डिस्प्ले आहे आणि तो कोर I7 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या लॅपटॉपमध्ये 32GB रॅम आणि 1TB SSD स्टोरेज आहे. यात Nvidia GeForce RTX 4070 ग्राफिक्स कार्ड आहे.

BEST Mini LED TVs: Samsung 65-inch Neo QLED 8K QN800D Smart AI TV

Neo QLED 8K स्मार्ट टीव्ही QN900D आणि QN800D या दोन व्हेरिएंटमध्ये 65, 75 आणि 85 इंच लांबीच्या स्क्रीन आकारात लाँच करण्यात आला आहे. 64 इंच लांबीचा स्क्रीन असलेला स्मार्ट टीव्ही 3,19,990 रुपयांना मिळतो आणि या सिरीजमधील सर्वात परवडणारा आहे.

High-end (35k – 50k): OnePlus 12R

OnePlus ने OnePlus 12R मध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले दिला आहे. यात LTPO4 AMOLED पॅनल आहे. कंपनीने आपल्या परवडणाऱ्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम, 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 5,500mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.

Mid-range smartphone (20k-35k): POCO F6

Poco ने अलीकडेच आपला नवीन F सीरीज स्मार्टफोन Poco F6 5G लाँच केला आहे. कंपनी या फोनला पॉवरफुल परफॉर्मर म्हणत आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन फ्लॅगशिप Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह सज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी 90W चार्जिंग सारखी फीचर्स आहेत.

Bluetooth Speakers: Sony Ult Field 7

जाता जाता मनोरंजन प्रेमींसाठी डिझाइन केलेले Sony Ult Field 1 हा एक कॉम्पॅक्ट ब्लूटूथ स्पीकर आहे. स्पीकर इको कॅन्सलिंग तंत्रज्ञानासह इनबिल्ट मायक्रोफोनसह येतो आणि त्याची किंमत 10,990 रुपये आहे. हे उपकरण 12 तासांच्या बॅटरी लाइफसह येईल. यात IP67 पाणी आणि धूळ प्रतिरोधक देखील आहे. हे प्रोडक्ट ब्लॅक, ऑफ-व्हाइट, फॉरेस्ट ग्रे आणि ऑरेंज कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :