Online Shopping : ‘FLIPKART’ आणि ‘AMAZON’ पेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहेत ‘या’ शॉपिंग वेबसाईट्स

Online Shopping : ‘FLIPKART’ आणि ‘AMAZON’ पेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहेत ‘या’ शॉपिंग वेबसाईट्स
HIGHLIGHTS

'FLIPKART' आणि 'AMAZON' पेक्षा स्वस्त शॉपिंग वेबसाईट्स

मिशो आणि शॉप्सीवर स्वस्त मिळतायेत मस्त प्रोडक्ट्स

शॉप्सीवर केवळ 5 रुपयांपासून खरेदी करता येईल

कोरोनानंतरही भारतात ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढली आहे. Flipkart आणि Amazon ची भारतीय ग्राहकांची खूप पसंती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, ऑनलाइन शॉपिंगसाठी इतर अनेक पोर्टल्स आहेत, जे फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनच्या तुलनेत स्वस्त दरात प्रोडक्ट्स ऑफर करतात. तुम्हालाही किफायतशीर किमतीत सर्वोत्तम प्रोडक्ट्स विकणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटबद्दल माहिती हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या दर्जाची प्रोडक्ट्स देणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटबद्दल सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा : 1800 रुपयांपेक्षा कमी किमतीत Gizmore उत्कृष्ट स्मार्टवॉच लाँच, तुमचे आरोग्य आणि फिटनेसवर असेल लक्ष

meesho

ही ई-कॉमर्स वेबसाइट परवडणाऱ्या किमतीत चांगल्या दर्जाची प्रोडक्ट्स देते. या वेबसाइटवरून तुम्ही फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनच्या तुलनेत अतिशय कमी किमतीत वस्तू खरेदी करू शकता. म्हणूनच मिशोच्या जाहिरातीत 'मिशो…मिशो… लु या ना लु मत सोचो' असे म्हटले जाते. यामध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सची मोठी रेंज पाहायला मिळेल.

याव्यतिरिक्त, Meesho वरून पहिली खरेदी केल्यावर, तुम्हाला 100 रुपयांची झटपट सूट दिली जाते. म्हणजेच तुम्ही 300 रुपयांची एखादी वस्तू खरेदी करत असाल, तर तुम्हाला Meesho वर पहिल्यांदा केवळ 200 रुपये द्यावे लागतील. या ई-कॉमर्स वेबसाइटवर इतर ई-कॉमर्स वेबसाइट आणि बाजारापेक्षा सुमारे 30 टक्के कमी किमतीत चांगली प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत.

शॉप्सी

Meesho प्रमाणेच, Shopsee वर परवडणाऱ्या किमतीत अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही शॉपसीवर फॅशन, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स, ब्युटी आणि परफ्यूम ते फुटवेअर यांसारखी प्रोडक्ट्स चांगल्या सवलतींसह मिळवू शकता. या ई-कॉमर्स वेबसाइटवर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देखील मिळेल. या वेबसाईटवर तुम्ही फक्त 5 रुपये किमतीपासून प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo