Brahmastra : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ, बघा व्हिडिओ

HIGHLIGHTS

Brahmastra चित्रपटामधून शाहरुखचा व्हीडिओ लीक

#ShahRukhKhan ट्विटरवर ट्रेंड

चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही कॅमिओ असण्याची शक्यता

Brahmastra : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ, बघा व्हिडिओ

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अभिनेता आर माधवनच्या रॉकेट्री आणि आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ असला तरी चाहते त्याच्या आगामी पठाण, डंकी आणि जवान चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रॉकेट्री आणि लाल सिंग चड्ढा नंतर शाहरुख आता ब्रह्मास्त्र चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे, ज्याची एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Xiaomi Mix Fold 2: 1TB स्टोरेज आणि Leica कॅमेरासह लाँच, जाणून घ्या किंमत

'ब्रह्मास्त्र'मधून शाहरुखची क्लिप लीक

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत सोशल मीडिया यूजर्समध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वी या चित्रपटात शाहरुख खानचाही कॅमिओ असणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान व्हिज्युअली पॅक्ड ऍक्शन सीनमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख खान 'वानर अस्त्र'च्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

#ShahRukhKhan ट्विटरवर ट्रेंड

शाहरुख खानचे चाहते ही क्लिप पाहून खूप उत्सुक झाले आहेत. आवडत्या अभिनेत्याचे कौतुक करत व्हीडिओवर अतिशय वेगाने प्रतिक्रिया देत आहेत. शाहरुख खानचे चाहते हा व्हिडीओ वेगाने शेअर करत आहेत. याद्वारे चाहते चित्रपटाबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करत आहेत. #ShahRukhKhan देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात केवळ शाहरुख खानच नाही तर अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही कॅमिओ असू शकतो. 

शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्ट्स

शाहरुख खान पठान या चित्रपटातून कमबॅक करत आहे. पठान जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय शाहरुख खानने राजकुमार हिरानीसोबत डंकी या चित्रपटाचीही अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नूची जोडी आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

 या दोन चित्रपटांशिवाय शाहरुख दिग्दर्शक एटलीसोबत जवान या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शाहरुख खानचा जवान 2 जून 2023 रोजी हिंदी तसेच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo