Xiaomi Mix Fold 2: 1TB स्टोरेज आणि Leica कॅमेरासह लाँच, जाणून घ्या किंमत

Xiaomi Mix Fold 2: 1TB स्टोरेज आणि Leica कॅमेरासह लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Xiaomi Mix Fold 2 स्मार्टफोन लाँच

नव्या फोनमध्ये 1 TB स्टोरेज उपलब्ध

फोनची सुरुवातीची किंमत सुमारे 1,06,200 रुपये

Xiaomi ने Samsung Galaxy Fold 4 च्या तुलनेत आपला नवीन फ्लॅगशिप आणि फोल्डेबल फोन Xiaomi Mix Fold 2 लाँच केला आहे. Xiaomi Mix Fold 2 सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे. Xiaomi Mix Fold 2 मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 12 GB RAM आहे. Xiaomi Mix Fold 2 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा E5 AMOLED डिस्प्ले देखील आहे. Xiaomi च्या या फोनच्या डिस्प्लेसह डॉल्बी व्हिजन आणि गोरिल्ला ग्लास विक्टसचा देखील सपोर्ट आहे.

 हे सुद्धा वाचा : Nokiaची पुन्हा जबरदस्त एंट्री! Nokia G80 5G लवकरच होणार लाँच, मिळतील उत्कृष्ट फीचर्स

Xiaomi Mix Fold 2 

Xiaomi मिक्स फोल्ड 2 मध्ये Android 12 सह MIUI FOLD 13 देण्यात आला आहे. याशिवाय यात 5G नेटवर्कसाठी सपोर्ट आहे. फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा E5 AMOLED डिस्प्ले आहे. डॉल्बी व्हिजन डिस्प्लेसह समर्थित आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा देखील सपोर्ट आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1,000 nits आहे. यातील दुसरा डिस्प्ले 8.02-इंच लांबीचा LTPO 2.0 आहे, ज्याचा रिफ्रेश रेट  120Hz आहे. याची ब्राईटनेस 1,300 nits आहे.

Xiaomi च्या या फोल्डेबल फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. ज्यामध्ये 12 GB LPDDR5 रॅम आणि 1 TB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. फोनमध्ये Leica ब्रँडिंगसह तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेल Sony IMX766 सेन्सर आहे. फोनमध्ये आणखी एक 8-मेगापिक्सेल लेन्स आहे, जो टेलिफोटो लेन्स आहे. तिसरा लेन्स 13 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाइड अँगल आहे. कॅमेरा 24fps वर 8K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल. फोनमध्ये सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 20 mp चा कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, Xiaomi च्या या फोनमध्ये ब्लूटूथ v5.2, NFC, Dual Band Wi-Fi, USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये 67W चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी आहे.

Xiaomi Mix Fold 2 ची किंमत

भारतीय बाजारात Xiaomi Mix Fold 2 लाँच झाल्याची कोणतीही बातमी सध्या नाही. Xiaomi Mix Fold 2 च्या 12 GB RAM सह 256 GB व्हेरिएंटची किंमत 8,999 चीनी युआन म्हणजे सुमारे 1,06,200 रुपये आहे. तर, 12 GB  रॅमसह 512 GB स्टोरेजची किंमत 9,999 युआन म्हणजे सुमारे 1,18,000 रुपये आहे. 12 GB रॅम आणि 1 TB  स्टोरेजसह फोनची किंमत 11,999 युआन म्हणजेच सुमारे 1,41,600 रुपये आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo