SIM Card new rule 2024
New Sim Card Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने अलीकडेच सिम कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. हे नियम सोमवारी 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सिम स्वॅप आणि ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे म्हटले जात आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांपासून सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणे हा सरकारचा मुख्य उद्देश होय.
आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी वेळ लागेल. देशात होणाऱ्या फसवणुकी कमी करण्यासाठी TRAI ने मार्चमध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. दरम्यान या अपडेटनंतर, सिम चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास, तुम्हाला नवीन सिमसाठी 10 ऐवजी 7 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, त्यानंतरच सिम पोर्ट करता येईल.
या नव्या नियमासह सरकार वापरकर्त्यांना होणारी गैरसोय कमी करू इच्छित आहे. परंतु त्याच वेळी सरकारला सिमचे फ्रॉड पोर्टिंग थांबवायचे आहे. कारण फ्रॉड पोर्टींग आजकाल अगदी सामान्य झाले आहे.
TRAI च्या दुसऱ्या नव्या नियमाबद्दल बोलायचे झाल्यास, आता सरकारने एक अतिरिक्त निकष सादर केला आहे, ज्या अंतर्गत ते युनिक पोर्टिंग कोड (UPC) साठी केलेली रिक्वेस्ट नाकारू शकतात. जर तुम्ही तुमचे सिम कार्ड Swap किंवा रिप्लेस करण्याचा विचार करत असाल तर UPC खूप महत्वाचे आहे. आता कोणत्याही वापरकर्त्याने 7 दिवसांच्या आत सिम Swap किंवा रिप्लेस करण्याची रिक्वेस्ट सबमिट केल्यास त्याला UPC दिली जाणार नाही.
सिम बदलण्याशी संबंधित फसवणुकींना मोठ्या प्रमाणात टाळण्यासाठी हा सरकारचा आणखी एक सुरक्षा प्रयत्न आहे. मात्र, प्रतीक्षा वेळ 10 दिवसांवरून 7 दिवसांवर आणून अनेक वापरकर्त्यांना दिलासा नक्कीच मिळाला आहे.