5G In India : 'या' 13 शहरांमध्ये 5G सर्वप्रथम लाँच होणार, बघा संपूर्ण यादी

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 23 Aug 2022 16:41 IST
HIGHLIGHTS
  • 13 शहरांमध्ये प्रथम 5G लाँच होणार

  • महाराष्ट्रातील दोन शहरांची यादीत नावे

  • देशभरात 5G वेगवेगळ्या टप्प्यात लाँच होणार

5G In India : 'या' 13 शहरांमध्ये 5G सर्वप्रथम लाँच होणार, बघा संपूर्ण यादी
5G In India : 'या' 13 शहरांमध्ये 5G सर्वप्रथम लाँच होणार, बघा संपूर्ण यादी

5G चे कमर्शियल लॉन्चिंग जाहीर करण्यात आले आहे. Airtel, Jio आणि Vodafone Idea देशात कधीही 5G लाँच करू शकतात. एअरटेल आणि जिओने सांगितले आहे की, त्यांची 5G सेवा ऑगस्ट महिन्यातच सुरू होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीत या महिन्याच्या शेवटी Jio चे 5G लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

 त्याबरोबरच असेही बोलले जात आहे की, सरकार 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) मध्ये 5G लाँच करण्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 5G अपेक्षेपेक्षा लवकर लाँच केले जाईल, असे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : SAMSUNG चा हा फोन 3,000 रुपयांनी स्वस्त झाला, पाण्यात सुद्धा खराब होत नाही

अनेक रिपोर्ट्सनुसार, 5G लाँच देशभरात एकाच वेळी होणार नाही आणि त्याचे कव्हरेज 4G इतक विस्तृत नसेल. 5G वेगवेगळ्या टप्प्यात लाँच केले जाईल. पहिल्या टप्प्यासाठी, 13 शहरांची निवड करण्यात आली आहे जिथे 5G प्रथम लाँच केले जाईल. चला बघुयात यादी... 

या 13 शहरांमध्ये प्रथम 5G लाँच होणार!

अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई, 
पुणे. 

 या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सर्वप्रथम 5G अनुभवण्याची संधी मिळेल. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने काही स्पष्ट सांगितले नाही. गेल्या आठवड्यात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, सर्व दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमशी संबंधित पत्रे देण्यात आली आहेत.

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा