SAMSUNG चा हा फोन 3,000 रुपयांनी स्वस्त झाला, पाण्यात सुद्धा खराब होत नाही

SAMSUNG चा हा फोन 3,000 रुपयांनी स्वस्त झाला, पाण्यात सुद्धा खराब होत नाही
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A53 5G फोन 3,000 रुपयांनी स्वस्त

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत आता 31,499 रुपये

नवीन किंमतीसह हा फोन Amazon, Croma, Flipkart इ. वर उपलब्ध

जर तुम्ही SAMSUNG चा फोन स्वस्त होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचा एक जबरदस्त फोन स्वस्त झाला आहे. Samsung Galaxy A53 5G ची किंमत 3,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. Samsung Galaxy A53 5G या वर्षी मार्चमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. Samsung Galaxy A53 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. याशिवाय यात Exynos 1280 प्रोसेसर आहे. 

हे सुद्धा वाचा : Raksha Bandhan BO Collection : रक्षाबंधन चित्रपटाने आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली

Samsung Galaxy A53 5G 

 Samsung Galaxy A53 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4.1 देण्यात आला आहे. यात 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5nm Exynos 1280 प्रोसेसरसह 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे.

यामध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS आणि कनेक्टिव्हिटीसाठी टाइप-C पोर्ट आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP67 रेटिंग मिळाली आहे. यात 5000mAh बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.

Samsung Galaxy A53 5G मध्ये चार रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 12-मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल, तिसरी लेन्स 5-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे आणि चौथी लेन्स 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी सॅमसंगने फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

किंमत : 

6GB रॅम सह Samsung Galaxy A53 5G चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता 31,499 रुपयांना खरेदी करता येईल. पूर्वी त्याची किंमत 34,499 रुपये होती. तर 8GB रॅम सह 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत पूर्वी 35,999 रुपयांवरून आता 32,999 रुपये आहे. नवीन किंमतीसह हा फोन Amazon, Croma, Flipkart, Vijay Sales वरून खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo