Home News General Bhaubeej Wishes 2024: या शुभप्रसंगी द्या तुमच्या भाऊ-बहिणीला सुंदर शुभेच्छा! WhatsApp फोटोज, स्टेटस, AI स्टिकर्स Bhaubeej Wishes 2024: या शुभप्रसंगी द्या तुमच्या भाऊ-बहिणीला सुंदर शुभेच्छा! WhatsApp फोटोज, स्टेटस, AI स्टिकर्स Updated on 03-Nov-2024 HIGHLIGHTS
लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याची परंपरा आहे. भाऊबीज बहीण आणि भावामधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. WhatsApp द्वारे पुढील शुभेच्छा देऊन हा सण आनंदाचे साजरा करा.
Bhaubeej Wishes 2024 (image cradit: pexels.com)
Bhaubeej Wishes 2024: दिवाळीचा सण सुरु आहे, लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याची परंपरा आहे. दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊ दूज हा सण साजरा केला जातो. यावेळी रविवार 3 नोव्हेंबर रोजी हा उत्सव आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, हिंदू धर्मात हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. भाऊबीज बहीण आणि भावामधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. तुम्ही देखील या सणाला तुमच्या भाऊ बहिणी पासून लांब राहत असाल तर, WhatsApp द्वारे पुढील शुभेच्छा देऊन हा सण आनंदाचे साजरा करा.
15+ Happy Bhaidooj 2024 Wishes चंदनाचा धागा रेशमी धागा, सावनाचा सुगंध, पावसाचा शिडकावा, भावाची आशा बहिणीचे प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहीणीची वेडीही माया, भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा! सूर्याची किरणे, आनंदाचा प्रवाह, चंद्रप्रकाश, प्रियजनांचे प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! प्रेम आणि विश्वासाचे बंधन साजरे करा, जे काही मागाल ते तुम्हाला नेहमी मिळेल. भाऊबीजच्या शुभेच्छा! नशीबवान असते ती बहीण, जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात, प्रत्येक संकटात असते त्याची साथ, भाऊबीजेच्या मन:पूर्वक शुभेच्छा! सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा! क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख -लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा पवित्र सण. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हा, ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे, बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे, भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा! भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ, या नात्याला न लागो कोणाचीही नजर, दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची, आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! पहिला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! नाते भाऊ बहिणीचे, नाते पहिल्या मैत्रीचे, बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा. दिवाळीचे हे दिवे लखलखते, उजळून टाकू दे बंध प्रेमाचे, चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! WhatsApp Status साठी Video डाउनलोड करा. सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या भाऊबीज व्हीडिओची लिंक कॉपी करा. आता गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा. आता तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स मिळतील. एखादी योग्य साईट निवडून ओपन करा आणि तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा. या अगदी सोप्या प्रक्रियेने तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा. हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल. आता फोनच्या गॅलरीद्वारे हा व्हीडिओ तुम्ही तुमच्या WhatsApp साठी Status वर ठेऊन तुमच्या भावंडांना भाऊबीजेच्या विशेष शुभेच्छा देऊ शकता.
Meta AI फीचर WhatsApp आणि Instagram वर उपलब्ध आहे. यावर कमांड देऊन तुम्ही Happy Bhaubeej 2024 इमेजेस तयार करू शकता.
तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करावे लागेल. होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन दिसेल. या ब्लु आयकॉनवर क्लिक करा. मग तुम्ही Meta AI ला कमांड द्या. उदा. Happy Bhaubeej Images 2024. आता Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल. तुम्ही Meta AI ला कमांड देऊन हे Happy Bhaubeej 2024 इमेजेस कस्टमाइज करून घेऊ शकता. Reshma Zalke Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.