Happy Republic Day 2025 Wishes: सर्व देशभक्तांना प्रजासत्ताक दिनाच्या WhatsApp वर द्या अप्रतिम शुभेच्छा! AI द्वारे बनवा इमेजेस, स्टिकर्स

Updated on 26-Jan-2025
HIGHLIGHTS

भारतात दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अमलात आणले गेले.

आपल्या प्रियजनांना आणि देशभक्तांना WhatsApp द्वारे द्या अप्रतिम शुभेच्छा.

Happy Republic Day 2025 Wishes: आपणा सर्वांना माहितीच आहे की, दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे, ज्याला गणतंत्र दिवस म्हणून देखील ओळखले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान मांडले आणि संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारले. त्यानंतर, 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अमलात आणले गेले. या निमित्ताने आपल्या प्रियजनांना आणि देशभक्तांना WhatsApp द्वारे द्या अप्रतिम शुभेच्छा. तुम्ही मराठीतून तुमच्या प्रियजनांना पुढीलप्रमाणे शुभेच्छा देऊ शकता.

Also Read: रिलायन्स Jio ने युजर्सना परत एकदा केले नाराज! गुपचूप बंद केले ‘3’ व्हॅल्यू प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

प्रजासत्ताक दिनाच्या 10+ शुभेच्छा

  • उत्सव तीन रंगाचा, आकाशी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी हा भारत देश घडवला. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
  • भारत देश विविध रंगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा, गणतंत्र दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
  • कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे, समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
  • गणतंत्र दिनाच्या निमित्ताने संविधानाला आकार देणाऱ्या थोर व्यक्तींचे स्मरण करुया. चला तर मग, संविधानाचे पालन करण्याची प्रतिज्ञा करुया.
  • न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांचे प्रतीक असलेला आपला तिरंगा कायम उंच फडकत राहो. 26 जानेवारीच्या सर्व देशभक्तांना शुभेच्छा!
  • दीर्घकाळ संघर्ष चालला, अखेर मिळाले स्वातंत्र्य, आज आहे प्रजासत्ताज दिन, सर्व देशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
  • आपल्या हृदयात देशभक्तीची ज्योत तेवत राहो, देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळत राहो, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025!
  • देशभक्तीची भावना आपल्या हृदय अभिमान आणि समर्पणाने भरून जावो. चला एक चांगला आणि सशक्त भारत निर्माण करूया.
  • विविधता जपतो, एकतेचा धागा विणतो, शांतता टिकवतो, माणूसकीचा धर्म पाळतो. नेहमीच भारतीय असल्याचा गर्व मनी बाळगतो, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आपला भारत, श्रेष्ठ भारत! प्रजसत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025
  • गणराज्य दिन हा आपल्या देशाचा अभिमान आणि शक्तीचे प्रतीक आहे.
  • सर्व देशभक्तांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश नेहमी प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर राहो.

Meta AI द्वारे बनवा इमेजेस आणि स्टिकर्स

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा. यानंतर तुम्हाला कोपऱ्यावर एक ब्लु सर्कल दिसेल. तुम्हाला माहितीच आहे की, हा मेटा AI चा लोगो आहे.
  • मेटा AI वापरण्यासाठी तुम्हाला या ब्लु सर्कलवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, नवीन ‘Happy Republic day 2025’ च्या शुभेच्छा मॅसेज तयार करण्यासाठी, तुम्हाला टेक्स्ट बारमध्ये एक प्रॉम्प्ट द्यावा लागेल.
  • तुम्हाला कोणत्याही प्रकारची नवीन वर्षाची शुभेच्छा देणारी इमेज तयार करायची असेल, ती टेक्स्ट बारमध्ये लिहा आणि एंटर करा.
  • त्यानंतर, मेटा AI तुम्हाला एक इमेज क्रिएट करून देईल. स्टिकर्स बनवण्यासाठी देखील तुम्हाला समान प्रक्रिया फॉलो करू शकता.

अशाप्रकारे, तुम्ही WhatsApp वर मेटा AI द्वारे फोटोज आणि स्टिकर्स तयार करून तुमच्या संपर्कांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :