Chhatrapati Shivaji Maharaj Movies
Chhatrapati Shivaji Maharaj Movies: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या नवीनतम छावा चित्रपट नुकतेच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आणि सिनेरसिकांच्या मनावर राज्य करतोय. एवढेच नाही तर, हा चित्रपट कमाईच्या बाबतीत अनेक जबरदस्त चित्रपटांचे विक्रम मोडत चालला आहे. सध्या महाराष्ट्रात जिकडे तिकडे या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. मात्र, याआधीही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि त्यांच्या मावळ्यांवर आधारित अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. हे चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक चित्रपटांची यादी तयार केली आहे. पहा यादी-
‘शिवरायांचा छावा’ चित्रपट 2024 मध्ये रिलीज होताच चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले होते. यामध्ये औरंगजेबाला बुरहानपूर शहर दक्षिणेची राजधानी बनवायची होती. त्याने बहादूर खानला बुरहानपूरचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. त्याचा सरदार कक्कर खानच्या मदतीने बहादूर खानने तेथील रहिवाशांचे जीवन कष्टमय केले. हे सहन न झाल्याने, छत्रपती संभाजी महाराजांनी शहरावर हल्ला केला आणि लोकांना अन्याय्य राजवटीपासून वाचवले. भूषण पाटील, चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, मृणाल कुलकर्णी इ. प्रसिद्ध मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
शेर शिवराज चित्रपट 2022 वर्षी रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात महान आणि धाडसी प्रसंगांपैकी एक जिथे त्यांनी आपल्या हुशार युक्तीने आणि धैर्याने अफझलखानचा पराभव केला. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, दिप्ती धोत्रे, दिग्पाल लांजेकर, मुकेश ऋषी, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, वर्षा उसगावकर इ. प्रसिद्ध मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपट 2022 वर्षी रिलीज करण्यात आला होता. ही एका खऱ्या युद्धाची प्रेरणादायी कहाणी आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली फक्त 300 सैनिकांनी 15,000 च्या शत्रू सैन्याला रोखले आणि शिवाजी महाराज खेरा किल्ल्याच्या सुरक्षिततेपर्यंत पोहोचले. या चित्रपटात शरद केळकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, सायली संजीव इ. प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
फत्तेशिकस्त हा 2029 चा मराठी ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे, ज्यामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन आणि मृण्मयी देशपांडे यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सेट केलेला, हा चित्रपट मराठा नेत्याच्या पुणे शहरासाठी लाल महाल येथे शाइस्ता खानच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याबरोबरच्या प्रसिद्ध युद्धाभोवती फिरतो. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
फर्जंद चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाची कथा 1673 मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यातील योद्धा कोंडाजी फर्जंद यांच्या कथेचे अनुसरण करते. ज्यांनी 60 योद्ध्यांसह शत्रूच्या 2500 सैनिकांना पराभूत करून अवघ्या साडेतीन तासांत पन्हाळा किल्ला जिंकला होता. अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, मृण्मयी देशपांडे, प्रविण तरडे, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक इ. प्रसिद्ध मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट Amazon Prime Video वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.