Pushpa 2 OTT
‘Pushpa 2: द रुल’ या चित्रपटाच्या OTT रिलीजची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बातम्यांमध्ये सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल (रीलोडेड व्हर्जन)’ अखेर OTT वर उपलब्ध झाला आहे. होय, अतिरिक्त 24 मिनिटांच्या फुटेजसह हा चित्रपट प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर तेलुगू, हिंदी, मल्याळम, तमिळ, कन्नडा या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हिंदी भाषेत हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार की नाही? यावर शंका होती. मात्र, Netflix ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर पोस्ट शेअर करत हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होणार, अशी माहिती दिली. या पोस्टमध्ये मध्ये “पुष्पा भाऊ ने सून ली आपकी बात, अब पुष्पा का रुल हिंदी मे भी” असे लिहले आहे.
‘Pushpa 2: द रुल (रीलोडेड व्हर्जन)’ 30 जानेवारी रोजी Netflix वर प्रदर्शित झाला. पुष्पा 2: द रुल (रीलोडेड व्हर्जन) रनटाइम 3 तास 20 मिनिटांवरून 3 तास 44 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ज्यामध्ये 23 मिनिटांचे अतिरिक्त फुटेज आहे. या नव्या कंटेंटमध्ये पुष्पाराजचे पात्र आणखी सविस्तरपणे दिसेल. यामध्ये दाखवण्यात आले आहे की, लाल चंदनाच्या तस्करीसाठी आपल्या नेटवर्कला पुष्पाने आणखी मजबूत केले आहे. चित्रपट अभिनेत्री रश्मीने मंदाना पुष्पाची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे.
पुष्पा 2: द रुल 4 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. जगभरात या चित्रपटाने 1800 कोटी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट 2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट बनला आहे. साऊथचे प्रसिद्ध कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय, या चित्रपटात फहद फासिल, जगपती बाबू, अनसूया भारद्वाज आणि सुनील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तसेच, सुकुमार दिग्दर्शित आणि लेखन, पुष्पा 2: द रुलमध्ये श्रीकांत विसा आणि सुकुमार यांचे संवाद आहेत. नवीन येरनेनी आणि यलमांचिली रविशंकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.