OTT Releases This Week: सिनेरसिक आणि मनोरंजना विश्वात हा आठवडा खास असणार आहे. कारण, OTT प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीझ होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे, प्रेक्षकांनो मनोरंजनाच्या एका रोमांचक आठवड्यासाठी सज्ज व्हा. आम्ही तुम्हाला सांगतो की, बहुप्रतिक्षित Aashram 3 Part 2 पासून ते क्राइम-थ्रिलर डब्बा कार्टेलपर्यंत अनेक वेब सिरीज OTT वर रिलीज होतील. या आठवड्यात तुम्हाला बोल्ड, कॉमेडी आणि क्राईमचा तडका मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात आगामी सिरीजची संपूर्ण यादी पहा-
Also Read: केवळ Chhava चं नाही तर, OTT वर उपलब्ध ‘या’ ऐतिहासिक चित्रपटांनी देखील हादरवले थिएटर!
जिद्दी गर्ल्स ही सिरीज तुम्ही 27 फेब्रुवारी 2025 पासून Amazon Prime Video वर पाहू शकता. नेहा शर्मा, वसंत नाथ आणि शोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज आहे. ज्यामध्ये रेवती, नंदिता दास, सिमरन, नंदीश सिंग संधू, अनुप्रिया कॅरोली, अतिया तारा नायक, दीया दामिनी, उमंग भदाना, झीना अली इ. कलाकार आहेत. झिद्दी गर्ल्स ही दिल्लीतील सर्व-गर्ल्स कॉलेज, माटिल्डा हाऊसमधील पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 5 मुलींचा आणि त्यांच्या नवीन प्रिन्सिपलचा प्रवास दाखवते.
आश्रम सीझन 3 पार्ट 2 ही बहुप्रतीक्षित सिरीज आहे, जी 27 फेब्रुवारी 2025 पासून Amazon MX Player वर प्रीमियरसाठी सज्ज झाली आहे. ही प्रकाश झा यांनी दिग्दर्शित आणि लिहिलेली क्राइम थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्यामध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. हा सीझन त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, वाढत्या शत्रू आणि त्याच्याविरुद्ध निर्माण होणाऱ्या बंडाचे खोलवर चित्रण आजे. त्याचे साम्राज्य टिकेल का, की सत्य शेवटी त्याला उघड करेल? हे पाहण्यास आश्रम सिरीजचे चाहते उत्सुक आहेत.
डब्बा कार्टेल ही हितेश भाटिया दिग्दर्शित एक आगामी थ्रिलर ड्रामा वेब सिरीज आहे. डब्बा कार्टेल 28 फेब्रुवारी 2025 रोजी Netflix वर प्रीमियरसाठी सज्ज आहे. ही वेब सिरीज ठाण्यातील पाच सामान्य गृहिणींची कथा सांगते, ज्या नकळतपणे ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी त्यांच्या सामान्य वाटणाऱ्या टिफिन डिलिव्हरी सेवेचा वापर करून एका महागड्या ड्रग्ज कार्टेलमध्ये सामील होतात. क्राईम थ्रिलर कंटेंटच्या चाहत्यांसाठी ही सिरीज बेस्ट आहे.
सुपरबॉईज ऑफ मालेगाव, 28 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सुपरबॉईज ऑफ मालेगाव हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे, जो महाराष्ट्रातील मालेगाव या छोट्या शहरातील महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्यांच्या जीवनावर उलगडतो. यात आदर्श गौरव, अनुज सिंग दुहान आणि जगदीश राजपुरोहित मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात अली अब्बास, शशांक अरोरा, मुक्केम अर्शद, साकिब अयुब, प्रदीप बघेल, वरद भटनागर आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. थिएटरनंतर हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होईल, अशी माहिती मिळाली आहे.