Chhaava OTT
Chhaava OTT: मागील महिन्यात 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट चित्रपटगृहात म्हणजेच थिएटरमध्ये दाखल झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सर्वत्र या चित्रपटाची आणि जबरदस्त कमाई चर्चा सुरु आहे. होय, या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून चित्रपट 2025 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. अजूनही छावाचे ट्रेंड आणि क्रेझ महाराष्ट्रामध्ये कायम आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजीराजेच्या जीवनकहाणी आणि संघर्षावर आधारित आहे.
Also Read: विकी कौशलचा Chhaava आवडलाय? मराठा साम्राज्यावर आधारित ‘हे’ टॉप 5 चित्रपट नक्की पहा, OTT वर उपलब्ध
दरम्यान, चित्रपट रिलीज झाल्यापासून छावाच्या OTT रिलीजची चर्चा सुरु आहे. छावाच्या OTT रिलीजबद्दल सतत काही ना काही अपडेट्स येत असतात. ताज्या रिपोर्टनुसार हा चित्रपट एप्रिल महिन्यात OTT वर येईल, असे पुढे आले आहे. होय, आता छावाची OTT रिलीज तारीख एका ट्विटर हँडलद्वारे उघड करण्यात आली आहे, जी OTT अपडेट्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
अनेक वृत्तानुसार, ब्लॉकबस्टर छावाचे डिजिटल राईट्स प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix ने खरेदी केले आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता कुठलाही चित्रपट थिएटर रिलीजच्या जवळपास 2 महिन्यानंतर OTT वर रीलीज केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, OTT अपडेट्स देणाऱ्या प्रसिद्ध प्रकाशक OTT Stream Updates ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये बॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘छावा’ 11 एप्रिलपासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, चित्रपटाच्या OTT रिलीजबद्दल ही अपेक्षित माहिती आहे. याबद्दल अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
छावा चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजीराजेंची मुख्य भूमिका निभावली आहे. त्याबोरबरच, बॉलीवूड आणि साऊथ प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईची भूमिकेत आहे. तर, बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, डायना पेंटी आणि संतोष जुवेकर इ. प्रसिद्ध कलाकार देखील आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, छावा 500 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच प्रवेश करेल, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.