Chhaava OTT Release
Chhaava OTT Release: सध्या बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक ड्रामा चित्रपट ‘छावा’ भारी कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट या महिन्यात म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बिक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. तर, चित्रपटाच्या 13 व्या दिवशी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटगृह गाजवत असतानाच छावाच्या OTT रिलीजची चर्चा मनोरंजन विश्वात आणि सिनेरसिकांमध्ये सुरु आहे. छावाच्या OTT रिलीजबद्दल अनेक वृत्त देखील पुढे येत आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-
छावा चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत एक मोठे अपडेट पुढे आले आहे. प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix ने विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतल्याचे वृत्त आहे. त्याबरोबरच, बॉलीवूडच्या नेहमीच्या रिलीज पॅटर्ननुसार, ‘छावा’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्षात घ्या की, मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात प्रेक्षक कधीही त्याचा डिजिटल प्रीमियर पाहण्याची अपेक्षा करू शकतात. याव्यतिरिक्त, काही वृत्तानुसार हा चित्रपट 10 किंवा 11 एप्रिलला OTT वर दाखल होईल, असे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे, अशी देखील माहिती मिळाली आहे की, चित्रपट थिएटरमध्ये चांगला व्यवसाय करत असल्याने निर्माते त्याच्या OTT रिलीजचा कालावधी आणखी वाढवू शकतात. त्यानुसार हा चित्रपट 24 किंवा 25 एप्रिलला OTT वर रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, या तारखा अधिकृत घोषणेपर्यंत अनिश्चित राहतील.
रिलीजपूर्वी छावा चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावरून हे स्पष्ट झाले की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार आहे. त्यानंतर, आता चित्रपट प्रेमी त्याच्या OTT रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या चित्रपटात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याबरोबरच, रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त, या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या महाकाय अॅक्शनपटाने जागतिक स्तरावर 509 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ही कमाई अजून बरेच दिवस सुरु असेल.