उत्तम बॅटरी लाइफ आणि दमदार साउंडसह boatचे नवीन इअरबड्स लाँच, किंमत फक्त 1500 रुपये

Updated on 10-Jun-2022
HIGHLIGHTS

boatचे नवीन इयरबड्स Airdopes 191G भारतात लाँच

इयरबड्सची किंमत फक्त 1,500 रुपये

6 तासांपर्यंत टिकणारी बॅटरी उपलब्ध

boAt ने आपले नवीन ट्रू वायरलेस TWS इयरबड्स Airdopes 191G भारतात लाँच केले आहेत. हे डिवाइस विशेषतः गेमर्ससाठी डिझाइन केले आहेत. 6 तासांपर्यंत बॅटरी लाइफ आणि दमदार ऑडिओ असलेल्या या बड्सची किंमत 1,499 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही Amazon India आणि Flipkart वरून देखील हे इयरबड्स खरेदी करू शकता. बोटचे हे नवीन इअरबड्स ब्लॅक, ब्लु, ग्रे आणि रेड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतात. चला तर मग जाणून घेऊया कंपनी या बड्समध्ये काय ऑफर करत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

गेमर्ससाठी येणाऱ्या या बड्समध्ये कंपनी बीस्ट मोड देत आहे. या मोडमध्ये, या बड्समध्ये 65msची लो लेटेन्सी मिळते. boatचे हे नवीन बड्स स्टेम डिझाइनसह येतात. त्याबरोबरच इअरबड्सच्या बॉडीचा लुक जरा ट्रान्सपरंट आहे. 

हे सुद्धा वाचा : BSNLचा सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन देतो दररोज 3GB डेटा, बघा किंमत आणि इतर बेनिफिट्स

दमदार आवाजासाठी, कंपनी त्यात 6mm ऑडिओ ड्रायव्हर्स देत आहे. हे बड्स षटकोनी आकाराच्या चार्जिंग केससह येतात आणि त्यामध्ये ब्रीदिंग LED लाईट देखील असतो. बॅटरीबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की,  चार्जिंग केससह एका चार्जवर हे बड्स 30 तास टिकतात. बड्सच्या केसमधील बॅटरी 400mAh ची आहे.

बोटच्या या बड्समध्ये ENx टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. क्वाड माइक सेटअपसह या बड्समध्ये नॉइज फ्री कॉलिंग एक्सपेरियन्स मिळेल. याशिवाय या बड्समध्ये IWP सपोर्ट, ब्लूटूथ 5.2 आणि IPX5 वॉटर रेझिस्टंट रेटिंग सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला गेमिंगचाही शौक असेल, तर तुम्हाला कदाचित बोटचे हे इअरबड्स आवडतील.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :