Blaupunkt BTW20: HD साउंडसह मिळेल 14 तासांचा बॅटरी बॅकअप , बघुयात किंमत

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 06 Dec 2022 16:36 IST
HIGHLIGHTS
  • Blaupunkt BTW20 नवीन इयरबड्स भारतात लाँच

  • या इयरबड्सची किंमत एकूण 1,299 रुपये आहे.

  • केससह इअरबडमध्ये 30 तासांचा बॅटरी बॅकअप उपलब्ध

Blaupunkt BTW20: HD साउंडसह मिळेल 14 तासांचा बॅटरी बॅकअप , बघुयात किंमत
Blaupunkt BTW20: HD साउंडसह मिळेल 14 तासांचा बॅटरी बॅकअप , बघुयात किंमत

जर्मन ब्रँड Blaupunkt ने आपले नवीन ऑडिओ प्रोडक्ट Blaupunkt BTW20 इयरबड्स भारतीय बाजारात लाँच केले आहेत. या ब्लूटूथ इअरबड्समध्ये हाय डेफिनिशन साउंड आणि डीप बेस सपोर्ट आहेत. इअरबड्समध्ये 14 तासांचा बॅटरी बॅकअप आणि एका चार्जमध्ये जलद चार्जिंग सपोर्ट आहे. बघुयात नव्या इयरबड्सबद्दल सविस्तर माहिती... 

हे सुद्धा वाचा : खरंच ! Mi चा 'हा' फोन 8000 रुपयांनी स्वस्त, बघा फोनची नवीन किंमत

Blaupunkt BTW20 चे तपशील

Blaupunkt BTW20 TWS मध्ये क्रिस्टल क्लिअर ऑडिओ आणि डीप बेससाठी 10mm ड्रायव्हर्स आहेत. इयरबड्समध्ये हाय डेफिनिशन साउंडसह बिल्ट-इन माइकद्वारे समर्थित आहे. इयरबडसह स्मार्ट टच कंट्रोल उपलब्ध आहे. Blaupunkt BTW20 TWS मध्ये LED डिजिटल बॅटरी डिस्प्ले आणि Type-C च्या फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.

कंपनीचा दावा आहे की, यासोबत तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऍक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मिळते, ज्यामुळे तुम्हाला कॉलिंग दरम्यान चांगला ऑडिओ सपोर्ट मिळतो. तसेच, तुम्ही व्यस्त ठिकाणीही याचा वापर करू शकता. इतर कनेक्टिव्हिटीसाठी, सिरी आणि गुगल असिस्टंटला ब्लूटूथ 5.1 सह सपोर्ट करण्यात आला आहे.

नवीन TWS सह 40mAh बॅटरी आणि केससह 470mAh बॅटरी समर्थित आहे. बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की इयरबड्ससह तुम्हाला एका चार्जमध्ये 14 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. त्याच वेळी, केससह इअरबडमध्ये 30 तासांचा बॅटरी बॅकअप उपलब्ध आहे. इयरबड्ससह USB टाइट- C पोर्टच्या जलद चार्जिंगसाठी समर्थन आहे.  ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ते 30 मिनिटे प्ले केले जाऊ शकते.

किंमत : 

Blaupunkt BTW20 TWS 1,299 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हे इअरबड्स व्हाईट, ब्लॅक, ब्लु आणि ग्रीन रंगात सादर करण्यात आले आहेत. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून खरेदी करता येतील.

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा