खरंच ! Mi चा 'हा' फोन 8000 रुपयांनी स्वस्त, बघा फोनची नवीन किंमत

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 05 Dec 2022 13:48 IST
HIGHLIGHTS
 • Mi 11 Lite च्या किमतीत मोठी कपात

 • Xiaomi 11 Lite च्या 8 GB रॅम वेरिएंटच्या किंमतीत 8000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

 • मात्र, 6GB व्हेरिएंट पूर्वीच्याच किंमतीत येत आहे.

खरंच ! Mi चा 'हा' फोन 8000 रुपयांनी स्वस्त, बघा फोनची नवीन किंमत
खरंच ! Mi चा 'हा' फोन 8000 रुपयांनी स्वस्त, बघा फोनची नवीन किंमत

Xiaomi ने गेल्या वर्षी Mi 11 lite स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. मात्र, आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीत 8000 रुपयांनी मोठी कपात केली आहे. Mi 11 lite स्मार्टफोन 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज तसेच 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज पर्यायामध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. मात्र, यापैकी केवळ 8 GB  व्हेरियंटच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. तर दुसरा 6GB व्हेरिएंट पूर्वीच्याच किंमतीत येत आहे.

हे सुद्धा वाचा : Motorola चा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन नव्या स्टायलिश कलरमध्ये येणार, जाणून घ्या किंमत...

mi 11 lite ची नवीन किंमत

Mi 11 Lite च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 23,999 रुपयांना येतो. Xiaomi 11 Lite च्या 8 GB रॅम वेरिएंटच्या किंमतीत 8000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यानंतर Mi 11 lite ची किंमत 15,999 रुपये होईल. Mi 11 lite चा 6 GB व्हेरिएंट पूर्वीप्रमाणेच 21,999 रुपयांना विकत घेता येईल. 

Mi 11 Lite स्मार्टफोनचे फीचर्स

Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. Mi 11 Lite स्मार्टफोनचे पिक्चर रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आहे. Xiaomi 11 Lite NE 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. याशिवाय 8MP आणि 5MP चे कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. फोनच्या समोर 16 MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. 

Xiaomi Mi 11 Lite Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. पॉवर बॅकअपसाठी यात 4250mAh बॅटरी आहे, ज्याला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Mi 11 Lite स्मार्टफोन Jazz Blue, Tuscany Coral आणि Vinyl Black कलर पर्यायांमध्ये येतो.

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

शाओमी Mi 11 Lite 128GB 8GB रॅम Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 22 Jun 2021
Variant: 128 GB/6 GB RAM , 128 GB/8 GB RAM
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  6.67" (1080 x 2400)
 • Camera Camera
  64 + 8 + 5 | 16 MP
 • Memory Memory
  128 GB/8 GB
 • Battery Battery
  4250 mAh
Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

Advertisements

VISUAL STORY सर्व पहा