जगप्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp मध्ये एक नवीन मेसेज ट्रान्सलेशन फीचर येणार आहे. या फिचरद्वारे, वापरकर्ते कोणत्याही थर्ड पार्टी ऍपवर न जाता मेसेजचे भाषांतर करण्यास सक्षम असतील. हे फीचर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल, जे अनेकदा परदेशी संपर्कांना व्हॉट्सऍप मॅसेज पाठवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांना इंग्रजी संदेश पाठवला तर, तो मॅसेज आपोआप स्पॅनिश, अरबी आणि रशियन भाषेत अनुवादित होईल.
एवढेच नाही तर, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फीचर्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असेल, जे कंपनीच्या सर्व्हरचा वापर न करता वापरकर्त्याच्या डिव्हाइसवरच मॅसेज प्रक्रिया आणि भाषांतर करेल. चला तर मग जाणून घेऊयात नव्या फिचरबद्दल सर्व तपशील-
Also Read: Best Offer! Samsung Galaxy S23 Ultra वर हजारो रुपयांच्या Discount, डील मिस करू नका
WhatsApp ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणारी साईट Wabetainfo च्या ताज्या अहवालात WhatsApp बीटाचा हवाला देत नवीन मेसेज ट्रान्सलेशन फीचरबद्दल माहिती दिली आहे. या अहवालानुसार, काही बीटा टेस्टर्सना नवीन ‘Translate Messages’ फीचर मिळाले आहे.
हे फीचर ऑन केल्यानंतरच युजर्सना ऑन-डिव्हाइस मेसेज ट्रान्सलेशनची सुविधा मिळणार आहे. असे म्हटले जात आहे की, हे फिचर स्पॅनिश, अरबी, पोर्तुगीज (ब्राझील), हिंदी आणि रशियन सारख्या परदेशी भाषांना समर्थन देईल.
तुम्ही वर दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की, WhatsApp चे नवीन मेसेज ट्रान्सलेशन फीचर कसे कार्य करेल. कंपनी प्रायव्हसी सेक्शनमध्ये नवीन फिचर प्रदान करणार आहे. येथे वापरकर्त्यांना चॅट लॉक फीचर नंतर ट्रान्सलेट मेसेजेसचा पर्याय देखील मिळेल. त्यानंतर, त्यासमोरील टॉगल ऑन केल्यानंतर युजर्सना भाषा निवडण्याचा पर्याय मिळेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला इंग्रजीचे परदेशी भाषेत भाषांतर सहज करता येईल.
त्याबरोबरच, स्क्रीनशॉटच्या दुसऱ्या भागात असे दिसून येते की, तुम्ही समोरच्या व्यक्तीला इंग्रजीमध्ये मेसेज लिहिताच, तो मॅसेजनंतर परदेशी भाषेत अनुवादित केला जाईल. याशिवाय, तुम्हाला चॅटच्या वरच्या कोपऱ्यात भाषांतर पाहण्याचा आणि ते काढून टाकण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.