Important! WhatsApp च्या ‘या’ मॅसेजेसवर चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान। Tech News 

Important! WhatsApp च्या ‘या’ मॅसेजेसवर चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान। Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp वर होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे.

स्कॅमर तुम्हाला बनावट मॅसेजेस पाठवून तुमची फसवणूक करतात.

WhatsApp वरील 5 मुख्य प्रकारचे मेसेज आहेत, ज्याद्वारे स्कॅमर तुमची फसवणूक करू शकतात.

WhatsApp हे जगातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. सध्या असं क्वचितच कुणी असेल जो WhatsApp वापरत नाही. अनेक लोक WhatsApp चा वापर आपली महत्त्वाची आणि ऑफिसची कामे करण्यासाठी देखील करतात. WhatsApp मुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. मात्र, WhatsApp वर होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चालले आहे. होय, घोटाळेबाज WhatsApp च्या माध्यमातून भोळ्या लोकांची शिकार करतात. केवळ व्हॉट्सॲपवरील बनावट कॉलद्वारेच नाही तर स्कॅमर तुम्हाला बनावट मॅसेजेसद्वारे देखील फसवू शकतात.

हे सुद्धा वाचा: Affordable! नवीनतम Realme P1 सिरीजची भारतीय लाँच डेट Confirm! किंमत असेल 15000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

WhatsApp वरील 5 मुख्य प्रकारचे मेसेज आहेत, ज्याद्वारे स्कॅमर नेहमीच लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. पुढीलप्रमाणे सर्व WhatsApp मेसेजवर क्लिक करण्याबाबत नेहमी सावधगिरी बाळगा.

WhatsApp scam can steal your money in minutes
WhatsApp scam can steal your money in minutes

Job Notification (नोकरीची सूचना)

घोटाळेबाजांनी सामान्य माणसाच्या बेरोजगारीला देखील फसवणूक करण्याचे साधन बनवले आहे. अशा स्थितीत काही घोटाळेबाज व्हॉट्सॲपवर नोकरीच्या सूचनांचे बनावट मॅसेज पाठवतात. यामध्ये युजर्सना फॉर्म भरण्याच्या बहाण्याने फेक लिंक्स पाठवल्या जातात, ज्यामध्ये यूजर्स त्यांची वैयक्तिक माहिती भरण्याची शक्यता असते. नेहमी लक्षात ठेवा की, अनेक कंपन्या व्हॉट्सॲपद्वारे नोकरीच्या ऑफर पाठवत नाहीत. यासाठी कंपनीची माणसं तुम्हाला तुम्हाला वैयक्तिकरित्या कॉल करतो.

Electricity Bill (विजेचे बिल)

घोटाळेबाज अनेकदा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल WhatsApp वर मॅसेज पाठवतात. त्यामध्ये तुम्ही ‘या’ कालावधी पर्यंत बिल न भरल्यास तुमचे वीज कापली जाईल, अशी माहिती असते. जेव्हा तुम्ही प्रतिसाद देता तेव्हा तुम्हाला एक PDF किंवा लिंक पाठवली जाते, त्यामध्ये ते तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायला सांगतात. याद्वारे देखील तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला असा मॅसेज आला तर, तुम्ही ऑफिसला जाऊन स्वतः तुमच्या विजेच्या बिलबद्दल चौकशी करा. या स्कॅमपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Bank Alert

WhatsApp वरील तिसरा प्रकार म्हणजे बँक अलर्ट होय. अशा मॅसेजेसमध्ये, वापरकर्त्यांना बनावट लिंकद्वारे KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले जाते. अशा घोटाळ्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे तुमचा पैसा चोरी करणे होय.

Wining Prize

WhatsApp वर तुम्हाला ‘तुम्ही बक्षीस जिंकले आहे!’ असे बरेच फेक मॅसेजेस येत असतील. मात्र, या मॅसेजेसना तुम्ही अजिबात बळी पडू नका. अशा मेसेजमध्ये युजर्सना सांगितले जाते की, त्यांनी लकी ड्रॉमध्ये लाखो रुपये जिंकले आहेत. रकमेचा दावा करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. असे मॅसेजेस घोटाळ्यांचा भाग आहेत, याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.

Delivery Problem Notification (वितरण समस्या सूचना)

WhatsApp वर असे काही मेसेजही येतात, ज्यामध्ये युजर्सना अशा डिलिव्हरी अयशस्वी झाल्याची माहिती दिली जाते, जी त्यांच्याकडे नव्हती. असे मॅसेजेस देखील सहजरित्या तुमची फसवणुक करू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo