Affordable! नवीनतम Realme P1 सिरीजची भारतीय लाँच डेट Confirm! किंमत असेल 15000 रुपयांपेक्षा कमी। Tech News 

Affordable! नवीनतम Realme P1 सिरीजची भारतीय लाँच डेट Confirm! किंमत असेल 15000 रुपयांपेक्षा कमी। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने Realme P1 अशा नव्या सिरीजची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे.

सिरीजअंतर्गत Realme P1 आणि Realme P1 Pro असे दोन स्मार्टफोन्स लाँच होतील.

Realme P1 सीरिजच्या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह

अलीकडेच प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता आपली नवीनतम Realme P सिरीज भारतात सादर करणार, अशी चर्चा टेक विश्वात रंगली होती. त्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच कंपनीने Realme P1 अशा नव्या सिरीजची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. या सिरीजअंतर्गत Realme P1 आणि Realme P1 Pro असे दोन स्मार्टफोन्स लाँच होतील. याशिवाय, या सिरीजच्या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. एवढेच नाही तर, फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे नव्या सिरीजमधील फोनचे अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत.

Realme P1 सिरीजचे इंडिया लॉन्चिंग डिटेल्स

वर सांगितल्याप्रमाणे, Realme P1 सीरिजच्या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. त्याबरोबरच, कंपनीने आपल्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे देखील फोनची इंडिया लाँच डेट कन्फर्म केली आहे.

वर दिलेल्या पोस्टवर, Realme P1 सिरीज 15 एप्रिल 2024 रोजी भारतात सुरू होईल. सिरीजमधील दोन्ही फोनची लिस्ट कंपनीच्या साइटवर आणि Flipkart वर लाइव्ह झाली आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनचे फीचर्सच नाही तर किंमत श्रेणी देखील समोर आली आहे.

Realme P1 सिरीज Flipkart लिस्टिंग

फ्लिपकार्ट सूचीद्वारे Realme P सिरीजच्या लाँच डेटसह फीचर्सदेखील उघड झाले आहेत. कंपनीने पुष्टी केली आहे की, Realme P1 फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात पंच-होल कटआउटमध्ये स्थित सेल्फी कॅमेरा असेल. Realme P1 फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज असेल. ही कंपनी 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑफर करेल.

तर, प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह कर्व AMOLED डिस्प्ले असेल. यामध्ये पंच-होल कटआउट देखील उपस्थित असेल. तर, Realme P1 Pro फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत दिला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo