WhatsApp Update: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर दररोज नवनवीन फीचर्स सादर केले जात आहे. नव्या फिचरमध्ये कंपनी वापरकर्त्यांच्या सोयीचा नेहमीच विचार करते. आपणा सर्वांना माहितीच आहे की, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या स्टेटस फीचरप्रमाणेच WhatsApp स्टेटस देखील कार्य करतो. पण आतापर्यंत व्हॉट्सऍप स्टेटसवर मर्यादित काळासाठीच व्हिडिओ शेअर केले जातात.
मात्र, लवकरच व्हॉट्सऍपच्या नवीन फीचरमुळे ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे. लवकरच तुम्ही तुमच्या व्हॉट्सऍपवर केवळ एक मिनिट नाही तर, तब्बल 90 सेकंदांपर्यंतचे स्टेटस टाकण्यास सक्षम असाल.
Also Read: iQOO Z10 First Sale: सर्वोत्तम ऑफर्ससह नवा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध, मिळेल 7300mAh बॅटरी
WhatsApp ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, लवकरच व्हॉट्सऍपवर तब्बल 90 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ शेअर करता येतील. होय, आतापर्यंत ही मर्यादा केवळ 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करण्यापर्यंत होती. पण आता हा कालावधी वाढला आहे. आता तुम्ही संपर्कांसह शेअर करू इच्छिणारा मोठा व्हीडिओ सहज अपलोड करू शकता.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आगामी अपडेटमध्ये तुम्ही स्टेटसवर 90 सेकंदांपर्यंत म्हणजेच सुमारे दीड मिनिटांचे व्हिडिओ शेअर करू शकता. Wabetainfo ने आगामी फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. सध्या हे फिचर टेस्टींग फेजमध्ये आहे, कंपनी लवकरच ते इतर सर्व वापकर्त्यांसाठी देखील सादर करेल.
नुकतेच WhatsApp वापरकर्त्यांसाठी अनेक फीचर्स सादर करण्यात आली आहेत. युजर्स आता कलरफुल थीम वापरून त्यांचा चॅटिंग अनुभव वाढवण्यास सक्षम असतील. यापूर्वी चॅट बॅकग्राउंड बदलण्यासाठी मर्यादित पर्याय होते. पण आता तुम्हाला तब्बल 20 लाईव्ह चॅट थीम्स आणि कस्टमाइझ करण्यासाठी 30 नवीन वॉलपेपर ऑफर केले जातात.
याव्यतिरिक्त, आता तुम्ही WhatsApp वर व्हिडिओ प्लेबॅक स्पीड वाढवू शकता. पण आता तुम्ही 1.5x किंवा 2x वेगाने व्हिडिओ सहज पाहू शकता. व्हॉट्सऍपच्या या नवीन फीचरमुळे तुम्हाला कमी वेळेत मोठे व्हिडिओ वेगाने पाहता येतील.