WhatsApp च्या ‘या’ नव्या Special फिचरने उडवली खळबळ, महत्त्वाचे काम झाले आता अगदी सोपे। Tech News
WhatsApp ने एक Passwordless Login Option पर्याय लाँच केला आहे.
हे फिचर Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आहे.
Android Phones मध्ये WhatsApp Passkeys कसे अनेबल कराल?
WhatsApp आपल्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितततेची काळजी घेतो. प्रायव्हसी आणि सिक्योरिटी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आणि Android ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी, WhatsApp ने एक Passwordless Login Option पर्याय लाँच केला आहे. या फीचरच्या मदतीने आता यूजर्सना एक आगळा-वेगळा अनुभव मिळणार आहे.
Surveyया फीचरच्या मदतीने WhatsApp ला लॉगिन प्रक्रिया सुरळीत करायची आहे, त्यासोबतच सुरक्षा देखील वाढवण्याची योजना आहे. या नवीन फीचरद्वारे ग्राहक त्यांचा चेहरा, फिंगरप्रिंट किंवा पिन वापरून WhatsApp खाते सहज अनलॉक करू शकतात.
Android users can easily and securely log back in with passkeys 🔑 only your face, finger print, or pin unlocks your WhatsApp account pic.twitter.com/In3OaWKqhy
— WhatsApp (@WhatsApp) October 16, 2023
WhatsApp ने याबाबत X म्हणजेच ट्विटरवर अकाउंटवर ही माहिती दिली आहे. हे नवीन फीचर बीटा टेस्टिंग दरम्यान देखील दिसले आहे, आता ते Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आहे. Passkey चे सपोर्ट Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी काही आठवडे किंवा महिने देखील लागू शकतात.
Android Phones मध्ये WhatsApp Passkeys कसे अनेबल कराल?
- सर्वप्रथम WhatsApp ओपन करा आणि सेटिंग्ज मेनूवर जा.
- आता येथे तुम्हाला Account वर टॅप करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला passkeys निवडाव्या लागतील.
- आता तुम्हाला येथे Create a Passkey निवडावी लागेल.
- आता तुम्हाला या फीचरची माहिती पॉप-अपद्वारे मिळणार आहे. हे वाचून ‘Continue’ वर क्लिक करा.
- आता तुम्हाला गुगल पासवर्ड मॅनेजरकडून तुम्हाला व्हॉट्सऍपसाठी passkey बनवायची आहे का? असे विचारणारी सूचना मिळणार आहे.
- आता Continue to proceed वर क्लिक करा, आता तुम्हाला Use Screen Lock निवडावे लागेल.
- असे केल्याने तुम्ही ही passkey तयार होईल आणि त्यानंतर तुम्ही ती वापरू शकता.

पारंपारिक पासवर्ड इत्यादींना पासकी हा पर्याय मानला जात आहे. हे फीचर आल्यानंतर यूजर्सला कोणत्याही पासवर्डवर अवलंबून राहावे लागणार नाही. Apple आणि Google ने त्यांच्या युजर्सना हा सपोर्ट आधीच दिला आहे. Google त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड Passkeys वर हस्तांतरित करण्यास प्रोत्साहित करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile